Sunday, November 17, 2024

Latest Posts

शरद पवार ॲक्शन मोडवर, नव्या उमेदवारांचा केला शोध सुरु

| TOR News Network |

Sharad Pawar Latest News : आगामी  विधानसभेच्या निवडणुका डोळ्या पुढे ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार ॲक्शन मोडवर आले आहेत. (Sharad Pawar In Action mode) ते सध्या अनेक मतदारसंघांमध्ये स्वतः भेटी देत आहेत आणि नवीन उमेदवार शोधत आहेत.(Sharad Pawar In Search For new candidates)  या निवडणुकीत जास्तीत जास्त नव्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. ज्यांची जिंकून येण्याची क्षमता आहे आणि जे प्रामाणिकपणे लोकांसाठी लढणार आहेत अशा उमेदवारांच्या शरद शोधात पवार आहेत. तसेच उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट दिले जाणार आहे. पवार यांनी सोडून गेलेल्यांना परत न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं त्याबाबत विचार केला जाणार नाही, नव्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांचा विचार शरद पवार करत असल्याचं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं.(Dhairyashil Mohite Patil on Sharad pawar)

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश प्राप्त झाल्यानंतर महायुतीचे धाबे दणाणले आहेत. (Good Success to Mahavikas Aghadi in Lok Sabha Election) झालेल्या चुका महायुतीने टाळण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीनं महायुतीच्या बैठका होत आहेत. तर दुसरीकडं महाविकास आघाडीमधील नेत्यांनी सुद्धा आता अधिक जोमानं लक्ष देऊन वेळप्रसंगी रणनीती बदलून निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे असा इशारा, शरद पवार  यांनी दिलाय. शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणुकीच्या कामाच्या तयारीचे संकेत दिले आहेत.(Sharad Pawar On Vishansabha) मात्र, स्वतः शरद पवार हे सुद्धा तयारीला लागले आहेत.

शरद पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांकडून स्थानिक परिस्थितीचा आढावा तातडीनं मागवून घेतला आहे. (Sharad Pawar On Vidhansabha Situation Report) कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे आणि कोणत्या मतदारसंघांमध्ये आपल्याला अधिक संधी मिळू शकते याबाबत त्यांनी अहवाल मागवला आहे. त्यानुसार राज्यात कोणत्या ठिकाणी किती जागा लढवायच्या याबाबतचा विचार सुरू केल्याची माहिती, पक्षातील नेत्यांनी दिलीय.(Suspense on Ncp Seat Sharing in Mahavikas Aghadi)

आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बोलताना माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी आता कामाला जोरदार सुरुवात केलीय. आमच्या पक्षाला किती जागा वाट्याला येत आहेत याचा विचार न करता थेट कामाला सुरुवात करणार ही शरद पवार यांची खासियत आहे. त्या पद्धतीनं त्यांनी कामाला सुरुवात केलीय.

Latest Posts

Don't Miss