Saturday, January 11, 2025

Latest Posts

शरद पवारांचा परत सिक्सर ; भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीच्या संघात

| TOR News Network |

Sharad Pawar Latest News : जरी शरद पवार यांनी आयसीसी व बीसीसीआयच्या संघटनेला राम राम ठोकला असला तरी त्यांची राजकारणाच्या मैदानात तूफान बॅटींग सुरु आहे. अशातच होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकी पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी नेत्यांच्या रांगा लागत आहेत. (Mahayuti Leaders Shifting to Sharad Pawar Ncp) शरद पवारांनी यांनी परत एकदा भाजपला पुण्यात मेठा धक्का दिला आहे. (Sharad Pawar Shock Bjp)

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यानुसार, नेत्यांच्या बैठका, मेळावे सुरू आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराबाबत चाचपणी सुरु आहे. त्यात भाजपचे नेते माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. (Bapusaheb Pathare Join Ncp)

बापूसाहेब पठारे यांनी वडगावशेरी मतदारसंघातील एका गणेश मंडळात नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहोत आणि तुतारीकडून (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.(Pathare to contest Election from Sharad Pawar Ncp) त्यामुळे आपल्या भागात असलेल्या नातेवाईक, मित्रमंडळ यांना सांगा की, तुतारीला मतदान करावे, असे आवाहन केले होते.

बापूसाहेब पठारे यांनी थेट मुंबई गाठून शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेशावेळी माजी नगरसेवक महेंद्र पठारे, माजी नगरसेवक भय्यासाहेब जाधव हे उपस्थित होते. शरद पवार गटात बापूसाहेब पठारे यांनी प्रवेश केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी मतदारसंघातून शरद पवार गटातून त्यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

Latest Posts

Don't Miss