Saturday, January 11, 2025

Latest Posts

साताऱ्याच सस्पेन्स अखेर संपला, शरद पवार गटाकडून हा उमेदवार जाहीर

| TOR News Network |  Satara Seat Declared : साताऱ्यासाठी शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. साताऱ्यातून शरद पवार कोणाला उमेदवारी देणार? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव माघार घेतली. त्यानंतर उमेदवार कोण? अशी चर्चा सुरु झालेली. बारामतीप्रमाणे साताऱ्याचा कौल काय? याकडेही राज्याच लक्ष आहे. (Sharad Pawar Declared satara loksabha seat)

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून अखेर साताऱ्यासाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. साताऱ्यात शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.त्यामुळे तेथे थेट सामना उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध होऊ शकतो.(Shashikant Shinde vs Udayanraje Bhosale) अजून महायुतीने साताऱ्यातून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“मी पवारसाहेब आणि साताऱ्यातील जनतेचे आभार मानतो. हा चव्हाण साहेबांच्या, पवार साहेबांच्या विचारांना मानणारा जिल्हा आहे. पक्षाच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या पाठिशी उभा राहिला आहे. माझी कोणाशी लढाई नाही” असं शशिकांत शिंदे म्हणाले. “या जिल्ह्यात शेतकरी, जनतेला अपेक्षित नेतृत्व उभ करण्याचा प्रयत्न करेन. या जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. त्यांना आवाज उठवणारा नेता पाहिजे. (Will Fight For People) काही लोकांचा आदर्श ठेवून काम करेन. चारवेळा आमदार, मंत्री झालो. कोरेगाव, जावळीच्या मतदारांनी पाठबळ दिलं” असं शशिकांत शिंदे म्हणाले.

“साहेबांनी जी लढायची भूमिका घेतली, काही झालं, तरी जो निर्णय घ्याल तो मान्य असेल” असं साहेबांना सांगितलेलं. “साताऱ्याचा आदर्श खासदार होण्याचा प्रयत्न करेन. (I will try to be an ideal MP of Satara) जनतेमध्ये सुप्त इच्छाशक्ती आहे. शेतकरी वर्ग नाराज आहे” असं ते म्हणाले. “माझ्या नावाची चर्चा सुरु झाल्यापासून अनेकांनी फोन करुन सांगितलं, आम्ही तुमच्यासोबत आहोत. समोर कोण उमेदवार आहे, यापेक्षा समोरचा उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार झाला. त्यांच्याशी माझ काही वैर नाही. पण ही निवडणूक जर जनतेने हातात घेतली, तर अपेक्षेपेक्षा पण मोठी क्रांती होईल” असं शशिंकात शिंदे म्हणाले.

Latest Posts

Don't Miss