Saturday, January 11, 2025

Latest Posts

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणावर कला संचालकांची खळबळजनक माहिती

| TOR News Network |

Kalasanchalak Latest News : मालवणमधील राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळताच राज्यात एकच संतापाची लाट पसरली आहे. राज्य सरकारने हा पुतळा नौदलाने उभारला असल्याचे म्हटल्यामुळे विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे. आता या प्रकरणामध्ये शिल्पकार जयदीप आपटे (JAydeep Apte) आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील (Chetan Patil) हे फरार झाले असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा आणि शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी खळबळजनक माहिती देत मोठे विधान केले आहे. (Directorate of Art Director Rajiv Mishra Big Statement)

राजकोट किल्ल्यावर काल (दि.28) मोठा राडा झाला. त्यानंतर आता त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. सरकारकडून देखील समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणावर एका वृत्तवाहिनीशी बातचीत केली. “यावेळी त्यांनी राज्यात कुठेही महापुरूषांचा पुतळा उभारायचा असल्यास कला संचलनालयाची परवानगी घ्यावी लागते. अन्यथा त्यांना पुतळा उभारता येत नाही. आमच्याकडे जेव्हा एखादी एजन्सी पुतळा उभारण्याची परवानगी मागते, तेव्हा त्याबरोबर त्यांना पुतळ्याचे क्ले मॉडेल सादर करावे लागते. या प्रकरणात शिल्पकाराने सहा फुटांचा क्ले मॉडेल सादर केला होता,” असा मोठा खुलासा राजीव मिश्रा यांनी केला आहे.(We Gave Only 6 feet statue Permission says Mishra)

त्यांनी पुढे सांगितले की, “क्ले मॉडेलला परवानगी देण्यासाठी सुद्धा मॉडेलची तपासणी केली जाते. यामध्ये महापुरूषाच हावभाव, त्यांची शारीरिक रचना यावर कटाक्ष टाकला जातो. त्यानंतरच परवानगी दिली जाते. अशी माहिती राजीव मिश्रा यांनी दिली. तसेच राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याबाबतच्या परवानगीविषयी बोलताना मिश्रा म्हणाले, “मालवणच्या घटनेमध्ये असे झाले की, आम्ही केवळ सहा फुटांच्या क्ले मॉडेलला मान्यता दिल्यानंतर तसे नौदललाही कळविण्यात आले. मात्र त्यानंतर हा पुतळा 35 फुटांचा केला जाणार आहे, याबाबत आम्हाला माहिती देण्यात आली नव्हती.(We Don’t Know About 35 Feet Statue Says Rajeev Mishra) तसेच पुतळ्याच्या स्ट्रक्चरमध्ये स्टेनलेस स्टिलचा वापर होणार आहे, याचीही आम्हाला कल्पना नव्हती. तसेच पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुविशारदाकडून घ्यावी लागते. दोन्ही परवानगी मिळाल्यानंतर शिल्पकाराला तसे पत्र दिले जाते. त्यानंतर शिल्पकाराची जबाबदारी असते” असा मोठा दावा राजीव मिश्रा यांनी केला आहे.

Latest Posts

Don't Miss