Saturday, January 11, 2025

Latest Posts

महाराजांचा पुतळा बनवणारे शिल्पकार जयदीप आपटे ‘नॉट रिचेबल’

| TOR News Network |

Jaideep Apte Latest News : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दोन दिवसांपूर्वी पडला. यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे.अशात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. आता या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर जयदीप आपटे सर्व कुटुंबासोबत घराला टाळे लावून फरार झाले आहेत. दोन दिवसांपासून ते नॉट रिचेबल झाले आहेत. ( Sculptor Jaideep Apte Not Reachable) तसेच कल्याण पश्चिमेत त्यांचा कारखाना आहे. तो कारखाना देखील ताडपत्रीच्या साह्याने बंद करण्यात आला आहे.

ठाणे येथील 25 वर्षीय युवा शिल्पकार जयदीप आपटे यांना राजकोट येथील शिवाजी महाराजाचा पुतळा निर्मितीची जबाबदारी दिली होती. त्यांना शिल्पकलेचा फक्त अडीच वर्षांचा अनुभव आहे. (Jaideep Apte Have only 2 and half year experience) त्यांनी आतापर्यंत दोन फुटांपर्यंतचे पुतळे उभारले आहेत, असे त्यांनीच एका मुलाखतीत म्हटले होते. 28 फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांना तीन वर्ष लागली होती. इतका कमी अनुभव असताना त्यांना हे काम कसे दिले गेले? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

शिल्पकार जयदीप आपटे याला कठोर शासन व्हावे व त्याला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले. प्रांताधिकारी मोशमी बर्डे- चौगुले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. पुण्यात महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले.(Mahavikas Aghadi Andolan) कोथरूडमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले गेले. बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले.

Latest Posts

Don't Miss