Sunday, January 12, 2025

Latest Posts

सत्यजित तांबे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

| TOR News Network |

Satyajeet Tambe Meet Fadnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. अशात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत असून आता नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. (Satyajeet Tambe Meet Devendra Fadnavis) यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांची जोरदार चर्चा झाली होती. कारण सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली असताना सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना ऐनवेळी महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) पाठिंबा दिला होता. त्यातच एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सत्यजित तांबे यांच्यावर आपली नजर असल्याचे म्हटले होते. सत्यजित तांबे यांच्यासारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार, अशी लोक जास्त दिवस बाहेर ठेवली की, आमची नजर त्यांच्याकडे जाते. (Devendra Fadnavis on satyajeet tambe) आम्ही चांगली माणसं गोळा करत आहोत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्याबाबत वक्तव्य केले होते. यानंतर सत्यजित तांबे यांना भाजपने छुपा पाठींबा दिल्याची चर्चा होती. सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.

आता आमदार सत्यजित तांबे अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे सत्यजित तांबे हे भाचे आहेत. सत्यजित तांबे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. या सत्यजित तांबे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Latest Posts

Don't Miss