Saturday, January 11, 2025

Latest Posts

सर लक्ष ठेवा त्याच्यावर….सरफराजच्या वडिलांची भावनिक साद

| TOR News Network | Sarfaraz Khan Father Latest News : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरी कसोटी राजकोटला सुरु आहे.आपल्या पदार्पणात भारताच्या सरफराज खानने तडाखेबंद फलंदाजी करत सर्वांचे मने जिंकली आहेत. त्याने पहिल्याच दिवशी अर्धशतक ठोकले. मात्र रविंद्र जडेजाच्या मुळे तो धावबाद झाला. सामना होताच सरफराजच्या वडिलांनी रोहित शर्माला भावनीक साद घातली. (Naushad Khan to Rohit Sharma)

आपलं स्वप्नं उतरताना पाहून सरफराज खानचे वडील नौशाद खान यांना गहिवरून आलं आहे. त्यांचे अश्रू थांबता थांबत नाहीत. कित्येक वर्ष वाट पाहिल्यानंतर अखेर सरफराज खानला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. पदार्पणाची कॅप मिळताच सरफराज खान आपल्या वडिलांना कॅप घालण्यासाठी धावला. त्याने वडिलांना आणि पत्नीला मिठीही मारली. दरम्यान रोहित शर्मानेही नौशाद खान यांचं अभिनंदन केलं.

सरफराज खानच्या पदार्पणानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात रोहित शर्माने नौशाद खान आणि सरफराज खानच्या पत्नीची भेट घेतल्याचं दिसून येत आहे. त्यावेळी नौशाद खान त्याला म्हणाले की, ‘ सर लक्ष ठेवा त्याच्यावर..’ यावर उत्तर देत रोहित शर्मा म्हणाला की, ‘ होय नक्कीच..आम्हाला चांगलंच माहीत आहे तुम्ही त्याच्यावर किती मेहनत घेतली आहे.’ गेल्या कित्येक वर्षांपासून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार खेळ करतोय. मात्र त्याला भारतीय संघात स्थान दिलं जात नव्हतं. अखेर रोहित धर्माच्या नेतृत्वाखाली त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली आहे.

Latest Posts

Don't Miss