Sunday, January 12, 2025

Latest Posts

श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशी करा

| TOR News Network | Sanjay Raut on Shrikant Shinde : लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर केलं आहे. मात्र आता शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंच्या फाऊंडेशनविरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली. (Shrikant shinde foundation) श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याबाबत संजय राऊत यांनी पंतप्रधानांना पत्र लिहीलं आहे. (Inquiry into suspicious financial dealings of Srikant Shinde Foundation)

खासदार संजय राऊत  त्यांनी ट्विट केलं असून आज सकाळी माध्यमांशी बोलतानाही राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. (Sanjay raut slams shrikant shinde) श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी आणि या उपक्रमांवर आतापर्यंत झालेल्या खर्च करण्यात आलेल्या निधीचा स्रोत नेमका काय?(What exactly is the source of funds?) असा सवाल राऊतांनी विचारला. याप्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. (Do inquiry of shrikant shinde foundation)

श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कार्यासाठी ज्यांनी कोट्यावधी रुपये दिले ते दानशूर कोण? (Who is the doner of crore rupees) ही माहिती नागरिकांना मिळणे गरजेचं असल्याचं संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.(Sanjay raut letter to pm modi) धर्मदाय आयुक्त या संदर्भात चौकशी करावी, अशा प्रकारची तक्रार वकील नितीन सातपुते यांनी धर्मदाय आयुक्त्यांकडे केली आहे. (Complaint to Charity Commissioner by sanjay raut) मात्र एक महिना उलटूनही या तक्रारीची कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नसल्याचं आणि माहितीच्या अधिकारात ही सगळी माहिती दिली जात नसल्याचा संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

चंदा दो धंदा लो हा खेळ राज्यात सुरू

चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्र राज्यातदेखील सुरू आहे. त्या खेळाचे सूत्रधार आहेत मिंधेसरकारचे बाळराजे ! सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत. (Crores of rupees are being recovered in the name of social work.)धर्मादाय आयुक्त हिशोब द्यायाला तयार नाहीत, असे ट्विट करत राऊत यांनी एक पत्रही पोस्ट केले.

Latest Posts

Don't Miss