Thursday, January 16, 2025

Latest Posts

सरकारची गुप्त माहिती सांगतो ते गोळ्या झाडण्याच्या तयारीत

| TOR News Network | Sanjay Raut Latest Statement Today : दिल्लीच्या सीमेवर पंजाब मधून आलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतमालास किमान आधारभूत किंमत मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यांना रोखण्यासाठी सशस्त्र सेना तैनात करण्यात आलेली आहे. परंतु शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.(Delhi Farmer Protest) दुसरीकडे शेतकरी पुढे गेले तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची सरकारची तयारी आहे, अशी आपल्याकडे गुप्त माहिती असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Farmers Will be Shoot Down)

मराठा आरक्षण म्हणजे फसवा फसवीचा खेळ

महाराष्ट्र आणि पंजाब हे कृषिप्रधान राज्य आहेत. कांदा निर्यात महाराष्ट्रात शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांनी पाठिंबा द्यावा, यासाठी आपण उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. उद्या सकाळी उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. मराठा आरक्षणचा विषय म्हणजे सरकारकडून फसवा फसवीचा खेळ आहे. (Reservation is a game played by maha govt) भाजप हा पक्षच फसवा फसवीच्या पायावर उभा आहे. मराठा समाजाबाबत सरकारने फसवणुकीचा प्रकार केला. तो मराठा समाजाला मान्य नाही. राज्यात उद्या जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर उद्या मंत्री रस्त्यावर नाचणार आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

भुजबळ, जरांगे-पाटलांना राऊतांनी काय खडसावले

जागा वाटपाचा तिढा सुटलेला

महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. एकमेकांशी संपर्क सुरू आहे. जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे. (The allotment of seats is over) राहुल गांधी यांची भारत जोडून यात्रा महाराष्ट्रात येण्याआधी महाविकास आघाडीचे जागावाटप घोषित केला जाईल. (Mahavikas Aghadi will announced Seat allocation) महाविकास आघाडीत या विषयावरुन कोणतेही मतभेद नाही.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा महाराष्ट्रात येणार आहे. त्यांना महाराष्ट्राची भीती वाटत आहे. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम, बंगाल, केरळ तामिळनाडू, हरियाणा ही जी प्रमुख राज्य आहेत या राज्यमध्ये भाजपाला अजिबात स्थान नाही. हेच राज्य भाजपाची सत्ता उलथवून टाकतील, असा दावा राऊत यांनी केला.

Latest Posts

Don't Miss