Saturday, January 11, 2025

Latest Posts

हे चोर लोकं बोलत आहे, ज्यांनी पार्टीवरती डाका टाकला

Theonlinereporter.com – May 16, 2024 

Sanjay Raut on PM Modi : नाशिकमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसवर वाग्बाण सोडले. (Modi On Uddhav Thackeray) त्यांनी दोघांवर तुफान हल्लाबोल चढवला. नकली शिवसेनेने काँग्रेससमोर गुडघे टेकविल्याचा आरोप मोदींनी केला होता. त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Sanjay Raut Slams Pm Modi)

हे चोर लोकं बोलत आहे, ज्यांनी पार्टीवरती डाका टाकला. (Sanjay Raut After modi Rally) यांनी मान्य केलं की चोरी केली आहे. हे कसे लोक आहेत जे पार्टी चोरी करतात आणि वरतून बोलतात,असा चिमटा राऊतांनी काढला. चोराला मदत करणारे पंतप्रधान, गृहमंत्री, निवडणूक आयोग हे लोक चोरांचे साथीदार असल्याचा आरोप त्यांनी केला.(Sanjay Raut On Amit shah) हेच लोक चोरांचे सरदार आहेत. त्यामुळे आम्हाला देशात परिवर्तन आणायचा आणि देशाचे संविधानाचा बचाव करायचा आहे. (Sanjay raut on samvidhan) 4 जून रोजी सर्व चित्र स्पष्ट होईल असा टोला त्यांनी लगावला.

4 जून नंतर या देशात भाजपाचे अस्तित्व राहणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. परंतु विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला सन्मानाचे पद मिळावे ही अपेक्षा आहे. (Sanjay Raut on Bjp) ममता बॅनर्जी आमच्या सोबत आहेत. त्या सुद्धा नरेंद्र मोदींना विरोध करत आहेत जे काय होईल ते सोबत होईल. (Sanjay Raut on Mamta banarjee) ही पापाची आघाडीने नाही तर यांच्या बापाची आघाडी आहे येणाऱ्या काळात हे त्यांना कळेल.

हे सरकार एक घटनाबाह्य सरकार आहे. (Sanjay Raut on Maha Govt) घटनाबाह्य मुख्यमंत्री प्रचार करतात. घटना बाह्य उपमुख्यमंत्री प्रचार करत आहेत.जे दोन घटना बाह्य पक्ष बरखास्त व्हायला पाहिजेत. (Sanjay Raut On Cm Shinde) घटनेतील दहाव्या शेडूलनुसार ते बरखास्त झाले पाहिजेत. ते प्रचार करत आहेत ज्या घटनेचे रक्षण केले पाहिजे. सर्वोच्च न्यायालय यावर तारीख देत आहेत.म्हणून आम्ही संविधान बचावाची लढाई या लोकसभेमध्ये लढत असल्याचे राऊत म्हणाले.

Latest Posts

Don't Miss