Saturday, January 11, 2025

Latest Posts

संजय राऊतांचा काँग्रेस नेत्यावर हल्लाबोल

| TOR News Network | Sanjay Raut On Sangli Seat : सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील तिढा कायम आहे. शिवसेना ठाकरे गटाने डबल मबाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. पण सांगली हा आमचा गड आहे, इथे आमचाच उमेदवार द्या, अशी भूमिका सांगली जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. (Shivsena  congress both claims Sangli seat) काँग्रेसकडून वारंवार सांगलीच्या जागेवर दावा केला जात असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सगळ्यावर भाष्य केलं आहे.(Sanjay raut angry on congress)

विशाल पाटील हे सांगलीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसचे नेते, माजी मंत्री विश्वजित कदम आणि विशाल पाटील दिल्लीत आहेत. (Vishwajeet kadam in delhi) तिथे पक्षातील वरिष्ठांशी सांगलीच्या जागेवर चर्चा करत आहेत. विशाल पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याचा दाखला देत संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे. विश्वजीत कदम हे पायलट आहेत, हे विशाल पाटील यांनी वक्तव्य 10 मार्च रोजी बुरली येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. विशाल पाटील यांचे कोणी तर पायलट आहेत. पायलट नेईल तिथे ते जात आहेत. विशाल पाटील यांचं विमान गुजरातच्या दिशेने जात आहे. (Vishal patil from sangli lok sabha) आता विमान गुजरातला उतरू शकतं. विशाल पाटील नेमकं कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार आहेत? असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.(Sanjay raut on sangli seat)

राऊतांचा भाजपवर निशाणा

महाविकास आघाडीतील वसुली रॅकेटर वाले सर्व भाजपात गेले आहेत. देशभरातील वसुली रॅकेटर भाजपात गेले, त्यामुळे भाजपाचे आभार… महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उध्दव ठाकरे, शरद पवार असा सामना आहे. नरेंद्र मोदींचा पराभव निश्चितपणे होणार आहे. फडणवीस कोणत्या तरी अंधारात चाचपडत आहेत, असं राऊत म्हणाले.

Latest Posts

Don't Miss