Saturday, January 11, 2025

Latest Posts

राम मंदिर काय तुमच्या बापाचं आहे का ?

खासदार संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

Sanjay Raut Latest Statement On Ram Mandir : पुढील महिन्यात २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्ताने देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या उद्घाटनाला जाण्यावरूनही राजकीय दावे-प्रतिदावे झाल्याचं पाहायला मिळालं. यावरून आता ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी अयोध्येला जाऊ नये, अशी विधानं करण्यात आल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता त्यावर राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “राम मंदिर काय कुणाच्या बापाचं आहे का? (Ram Mandir in not any ones private property) तुम्ही काय राम मंदिराचे मालक आहात का? तुम्ही या देशाचे अपशकुन आहात. इव्हीएम आहेत म्हणून तुम्ही आहात. जनता तुमच्याबरोबर नाहीये. नरेंद्र मोदी रामाचे अवतार आहेत हे हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? आरएसएसला मान्य आहे का? विश्व हिंदू परिषदेला मान्य आहे का ? हे त्यांनी सांगावं. रामापेक्षा कुणी या देशात मोठं झालंय का? कुणी नवीन ब्रह्मदेव जन्माला घातलाय का?” असे सवाल संजय राऊतांनी उपस्थित केले.“तुम्ही कुठल्या बिळात कधी लपला होतात हे सगळं आमच्याकडे आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून तुम्ही ब्रिटिशांची माफी मागत आले. स्वातंत्र्यलढ्यात हे लोक ब्रिटिशांचे मुखाबिर होते. क्रांतीकारकांची माहिती ब्रिटिशांना देण्यात हे लोक पुढे होते. ते या देशाचे राज्यकर्ते झाले आहेत. हे देशाचं दुर्दैवं आहे”, असंही राऊत म्हणाले.राम मंदिराच्या अनुषंगाने भाजपा व काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

Latest Posts

Don't Miss