Sunday, January 12, 2025

Latest Posts

तर आम्ही 3000 रुपये देऊ हा आमचा शब्द आहे – खा.राऊत

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News :  लाडक्या बहिण योजनेचा आणखी एक हफ्ता लाच म्हणून द्यायचा आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली. लाडकी बहिण योजना टर्निंग पॉइंट ठरणार का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “ही काही नवीन क्रांती केलेली नाही.(Sanjay Raut on Ladki bahin Yojana) याआधी सुद्धा महिलांसाठी अशा योजना आणल्या आहेत. फडणवीस, अजितदाद आणि मिंधे स्वत:च्या खिशातले 1500 रुपये देत नाहीयत. हा लोकांच्या कराचा पैसा आहे. आमच सरकार आलं, तर आम्ही 3000 रुपये देऊ हा आमचा शब्द आहे” असं संजय राऊत म्हणाले.(Sanjay Raut commitment 3000 Rupees for Ladki Bahin yojana)

शिवसेना खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. (Sanjay Raut On Cm Shrikant Shinde) माकडाच्या हाती मशाल दिली, तर तो काय करणार? याला आज संजय राऊत यांनी उत्तर दिलं. “श्रीकांत शिंदेची डॉक्टकिची सर्टिफिकेट तपासा, चोरलेला धनुष्यबाण लोकसभेला छातीवर पडला. रावणाची औलाद आहे” अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.(Sanjay Raut Slams Shrikant Shinde)

“श्रीकांत शिंदे माकडाचा मुलगा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष चोरलाय त्यांनी. श्रीकांत शिंदेला लायकी नसताना, उद्धव ठाकरे यांनी खासदार बनवलं. त्याचा बाप आलेला, माझ्या मुलाकडे काम नाही. बेरोजगार आहे. डॉक्टरची डिग्री आहे, पण रुग्णालय चालवता येत नाही.(Sanjay Raut on shrikant shinde doctor Degree) मेडीकलच ज्ञान नाही. बापाने नाक रगडलं, लाज वाटली पाहिजे, बेशर्म माणूस” अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला.

Latest Posts

Don't Miss