Sunday, January 12, 2025

Latest Posts

संथ गतीने मतदानावर संजय राऊत भडकले : एका तासांमध्ये फक्त 11 लोकांचेच मतदान

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News : लोकसभा निवडणूक 2024 चे पाचव्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. तर यात मतदान प्रक्रिया अत्यंत संथगतीने झाल्याने खासदार संजय राऊत चांगलेच संतापले.(Sanjay Raut on slow voting) त्यांनी निवडणूक आयोगासह भाजपवर हल्लाबोल केला. निवडणूक आयोग भाजपची चाकरी करत असल्याचा घणाघातही त्यांनी केला. (Sanjay Raut slams Bjp)

पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासह भाजपवर गंभीर आरोप केला. 13 मतदारसंघत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पराभवाची खात्री झाल्याने त्यांनी मतदार यंत्रणा बिघवडवल्याचा आरोप त्यांनी केला.(Sanjay raut on tampering with the electoral system) पण जनतेने चिकाटीने मतदान केले. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले.(Sanjay raut claim win for mahavikas aghadi)

मतदान प्रक्रिया मुद्दामून संथ केल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला.(Sanjay Raut on slow voting in mumbai) मतदान प्रक्रिया संथ झाल्याने जनतेला मतदानासाठी रांगेत कित्येकवेळ उभे राहावे लागले. लोक कंटाळून निघून जातील, त्यांना मतदान करता येणार नाही,अशा प्रकारची यंत्रणा सोमवारी राबविण्यात आल्याची शंका राऊतांनी व्यक्त केली. ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाला, महाविकास आघाडीला भरघोस मतदानाची शक्यता होती, त्याच ठिकाणी कासवगतीने यंत्रणा राबविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

मशालीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होण्याची शक्यता होती. मात्र तरी देखील मतदान झाले आहे. मात्र त्या ठिकाणी मतदान यंत्रणा बिघडवून ठेवण्यात आले होते.(Sanjay raut on Evm system) एका मतदाराला दहा ते पंधरा मिनिटं लागत असल्याचं उघड कसा आला आहे. मुंब्रातील एका मतदारसंघांमध्ये एका तासांमध्ये फक्त 11 लोकांनीच मतदान केले. मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप भारतीय जनता पार्टी आणि मिंध्ये गट करत होते. त्यांच्यामध्ये पराभावाची भीती आहे हे आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनामध्ये आणले आहे.

भाजपसह मित्रपक्षांना मते मिळतील, अशा ठिकाणी मतदान यंत्रणा सुरळीत होती. पण महाविकास आघाडीला जादा मतदान मिळत असलेल्या ठिकाणी मतदान यंत्रणा बिघडविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर आम्ही जागरुक असल्यानेच त्यांना ईव्हीएम हॅक करता आले नाही, असे ते म्हणाले.(Sanjay raut on evm hack)

Latest Posts

Don't Miss