Saturday, January 11, 2025

Latest Posts

लक्षात ठेवा..नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आज तुमचे उद्या आमचे

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News : लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. त्यामुळे महाविकास आघाडीत मोठा उत्साह आहे. मात्र संख्या बळ कमी असल्याने त्यांना सरकार स्थापन करता आले नाही. यावर बोलताना संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. (Sanjay Raut Big Claim NDA ) नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीनं एनडीए देशात सरकार स्थापन करत आहे. (Sanjay Raut On NDA) मात्र नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे सगळ्यांचे आहेत.लक्षात ठेवा ते आज तुमच्याकडं आहेत, मात्र उद्या आमच्याकडं असतील, असा मोठा सूचक दावा संजय राऊत यांनी दिल्लीत केला.

एनडीए नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीनं केंद्रात सरकार स्थापन करणार आहे.(Nitish Kumar,Chandrababu Naidu Help NDA) मात्र नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे सगळ्यांचेच आहेत. आज नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू तुमच्याकडं आहेत. मात्र उद्या ते आमच्याकडं असतील, (Tomorrow they will be with us) असा सूचक दावा उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी दिल्लीत केला.

कंगना राणावतबाबत आपल्याला प्रचंड सहानुभूती आहे. (Sanjay Raut On kangana ranaut) मात्र आपल्या आईबाबत अपशब्द वापरल्यानं त्या महिला जवानानं कंगनाच्या कानाखाली लगावल्याचं स्पष्ट केलं. मात्र त्यांना कानाखाली लगावल्यानं हे चुकीचं असल्याचंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे एकेकाळी एकमेकांचे मोठे विरोधक असूनही संजय राऊत यांनी कंगनाची बाजू घेतल्याचं दिसून आलं.

आमदार संपर्कात आहेत, ते असं सांगायचं असतं का?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिंदे गट आणि अजितदादा गटाला या निवडणुकीत मोठं नुकसान सोसावं लागल्याने या दोन्ही गटात मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही गटाचे आमदार या निकालाने अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे हे आमदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे ही अस्वस्थता अधिकच वाढताना दिसत आहे. याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आलं. पण त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. आमदार संपर्कात आहेत, ते असं सांगायचं असतं का?, (Sanjay Raut On Mla Restless) असं उत्तर देत संजय राऊत यांनी सूचक संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात शिंदे गटाला राजकीय भूकंपाचे हादरे बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Latest Posts

Don't Miss