Saturday, January 11, 2025

Latest Posts

अजित पवार हे तर आर्थिक माफिया

संजय राऊत यांनी तर सरकारवर चौफेर टीका

Sanjay Raut On Ajit Pawar : मुंबईतील गोळीबारांच्या प्रकरणांमुळे विरोधक सरकारवर तुटून पडले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर सरकारवर चौफेर टीका केली. राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. त्यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर चौफेर टीका केली. (Sanjay Raut Slams Ajit Pawar) त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आर्थिक माफिया असल्याचा गंभीर आरोप लावला. राष्ट्रवादीतील घाडमोडींमुळे विरोधकांच्या आरोपांना आणि शब्दांना धार आली आहे.(Ajit Pawar Is Financial Mafia)

सरकारचे पैसे गुंडांसाठी

सरकारचे पैसे हे गुंडांसाठी वापरले जात आहे. कल्याणला गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला त्यात शिंदे आणि त्यांच्या चिरंजीवाच नाव आले आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी करायला हवी होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे गायकवाड यांचे कोट्यवधी रुपये पडून असल्याचे ते सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. पण त्यांच्याविरोधात काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

गृहमंत्री अदृश्य झाले

काल घोसाळकरांची निर्घुण हत्या झाली. महाराष्ट्रात कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाली आहे. कायदा सुव्यस्थेचा नंगा नाच पाहयला मिळत आहे. पुणे, नगर, राहुरी इथे हत्या झाल्या. मुंबईत अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली. यामध्ये गृहमुख्यमंत्री अदृश्य झाले आहेत. गृहमंत्री चाय पे चर्चा करत आहे. पण ह्या प्रकारांवर चाय पे चर्चा होणार आहे, असे ते म्हणाले.

मोदी आणि शाह सरकारचे अपयश

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गुंड्यांसोबत चाय पे चर्चा होत आहे आणि उपमुखमंत्री गृहमंत्री काय बघत आहे, असा घणाघात राऊत यांनी घातला. (Cms House is criminals spot) हे मोदी आणि शाह सरकारचे अपयश आहे. त्यांनी महाराष्ट्राचा सूढ घ्याचा ठरविला आहे. उपमुख्यमंत्री आज दिल्लीत जाणार आहे पण त्यात कारवाई करू असे म्हंटले आहेत का?मुंबईत एका लोकप्रतिनिधीची हत्या होते दिवसाढवळ्या आणि तुम्ही वाढदिवस कसले साजरे करतात. मी त्यांना एवढ्याच शुभेच्छा देईल की दीड वर्ष भोगले आता दूर व्हा. खोके जमले खोके वाटले आमच्या लोकांना दूर केले गेले. महाराष्ट्राची वाट लावली, असा प्रहार त्यांनी केला.

चिरंजीवाचे फोटो येत आहेत

ही गोष्ट फायदा घेणायची आहे का? तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही आर्थिक माफिया आहात.तुमच्या चिरंजीवाचे फोटो येत आहेत,अजित पवार हे आर्थिक माफिया आहेत, असा गंभीर आरोप राऊत यांनी यावेळी केला. यापूर्वी त्यांनी अजितराव, टोपी उड जायेगी, असा टोला काही दिवसांपूर्वी अजितदादांना लगावला होता.

Latest Posts

Don't Miss