Saturday, January 18, 2025

Latest Posts

राऊतांचा मोठा गौप्यस्फोट :  मोदीच्या रोड शो साठी येथून आला पैसा

Theonlinereporter.com – May 18, 2024 

Sanjay Raut Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत रोड शो करुन शक्ती प्रदर्शन केले. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर सणसणीत टीका केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.(Sanjay Raut Slam Modi) मोदींच्या रोड शोसाठी कोट्यवधींचा निधी कुठून आला? (Sanjay Raut Objection modi Road Show) त्यांच्या रोड शोसाठी कुणी खर्च केला? असा सवाल करत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांपूर्वी मुंबईत होते. काल ही ते मुंबईत होते. त्यांनी रोड शो केला. (Modi Road Show News) हा भारतीय जनता पक्षाचा प्रायव्हेट कार्यक्रम प्रचाराचा कार्यक्रम होता. त्यांच्यासोबत असलेल्या मिंधे आणि अजित पवार गटाचा होता. नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचा खर्च त्यांच्या पैशातून व्हायला पाहिजे होता. भाजपाच्या पैशातून व्हायला पाहिजे होता. परंतु जो पैसा खर्च झाला तो पैसा मुंबई महानगरपालिकेने खर्च केल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. (Sanjay Raut on Modi Road show)

संजय राऊत यांनी महायुतीवर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून 19 पैशांच्या बॅग कशा उतरल्या ते मी दाखवल्या त्यानंतर त्यांनी दोन दिवसानंतर नाटक करून त्यांचे कपडे दाखवले. प्रत्येक मतदारसंघात 25 कोटी रुपये त्यांनी पोचवले आहेत.(Sanjay Raut Slams Cm Shinde) पोलीस संरक्षणामध्ये पैशांचं वाटप होत आहे, असा आरोप राऊतांनी महायुतीवर केल.

मोदी यांच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेने 3 कोटी 56 लाख रुपये खर्च केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.(Sanjay Raut On mumbai Mahanagarpalika) हा आचारसंहितेचा भंग असल्याचे ते म्हणाले. याप्रकरणी मोदींवर गुन्हा दाखल व्हायला हवा, असे ते म्हणाले. मुंबईकरांना वेठीस धरायचं, मुंबईकरांच्या खिशावरती भार टाकायचा. भारतीय जनता पार्टीकडून हा पैसा वसूल केला पाहिजे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

Latest Posts

Don't Miss