Saturday, January 11, 2025

Latest Posts

प्रभू श्रीराम हे भाजपचे आहेत काय ?

खासदार संजय राऊत यांचा निमंत्रणावरुन भाजपला टोला

Sanjay Raut latest News : राम मंदिराच्या उद्घाटनाला शिवसेनेला निमंत्रण नाही. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही. बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्यांनी निमंत्रण दिलं नसतं. कारण हे श्रेय घेण्याचं राजकीय चढाईचा भाग बनला आहे.राम मंदिरासाठी ज्या लोकांनी योगदान दिलं आहे. त्यांना हे लोक कधीच सन्मानाने बोलवणार नाहीत. प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत. ते एका राजकीय पक्षाचे किंवा नेत्याची जहागीर नाहीत. (Sanjay Raut Says prabhu shri ram is not only for BJP) एकदा त्यांचा राजकीय सोहळा होऊ जाऊ द्या. मग आम्ही धार्मिक उत्सव करू, असे खासदार संजय राऊत म्हणालेत.

राम मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. ते म्हणालेत राम मंदिर उद्घाटन सोहळा अयोध्येमध्ये राम मंदिरासाठी शिवसेनेचे मोठं योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं देखील योगदान मोठं आहे आहे. आम्हाला ते बोलणार नाही. उद्धव ठाकरे त्या ठिकाणी गेले तर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा जयजयकार होईल, असं संजय राऊत म्हणालेत.

चर्चा काँग्रेस हायकमांड समोर होईल

उद्धव ठाकरे दिल्लीत गेले. तेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी ,खर्गे आम्ही एकत्र बसून चर्चा केली आहे. त्या चर्चेत काय घडलं ते आम्हालाच माहिती आहे. जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात नाही दिल्लीत त्याची चर्चा होईल. काँग्रेस हायकमांड समोर होईल. शिवसेना -आम्ही 23 जागा लढवणार, असं राऊतांनी स्पष्ट केलं.

…ते घंटा वाजवायला जात आहे

देशाची सुरक्षा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पूर्णपणे खेळखंडोबा केला आहे. जम्मू काश्मीर येथील जवानांवरती हल्ला झाला. 370 कलम हटवल्यानंतर हे उत्सव साजरा करत आहेत. संसदेत बेरोजगार तरुण घुसतात. संसदेच्या सुरक्षेला तडे मारतात. संसदेत चर्चा होऊन दिली जात नाही. दीडशे खासदार निलंबित करतात. पुलवामा प्रमाणे हल्ला केला जातो. हे देशाचे दुर्दैव आहे हा मिनी पुलवामा हल्ला सध्या काश्मीरमध्ये झाला आहे. उघड्या डोळ्यांनी कत्तल होत आहे आणि राम मंदिर यांची घंटा वाजवायला ते जात आहे या घंटा त्यांच्या डोक्यात आपटल्या पाहिजेत, असं राऊतांनी म्हटलंय.

Latest Posts

Don't Miss