Monday, January 13, 2025

Latest Posts

240 हा भाजपचा आकडा नाही हा तर ईडी सीबीआयचा आकडा

| TOR News Network |

Sanjay Raut On Lok Sabha Result : लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी भाजपची बऱ्याच राज्यात पिछेहाट झालेली दिसत आहे. महाराष्ट्रातही महायुतीला मोठा फटका बसला असून यामुळे भाजपच्या गोटातील चिंता वाढली आहे. निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. (No clear majority To Bjp) याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut Slams Modi) 240 हा भाजपचा आकडा नाही हा तर ईडी सीबीआयचा आकडा आहे. नरेंद्र मोदी हे भगवान, ते पराभूत झाले आहेत. (Modi Lost in Lok sabha) मोदी हा आतापर्यंत चेहरा होता त्यांची गॅरंटी संपली आहे.(Guarantee Ended Of Modi) तुम्ही पराभव स्वीकारा, बीजेपीला बहुमत मिळालं नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.(Sanjay Raut On Modi)

एवढंच नव्हे तर मोदी ब्रँड संपला आहे, ईडी सीबीआयने जेवढं बहुमत आहे तेवढ आणले आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार हे दोन जे बांबू आहेत त्यांच्यावर ते सरकार बनवणार आहेत.मोदी यांचे नाक कापला गेला आहे त्यामुळे विना नाकवाला पंतप्रधान आम्हाला नको, असा हल्ला राऊत यांनी चढवला.

लोकसभा निवडणुकीत भाजप हरली आहे. (Bjp Lost Lok Sabha 2024) आमच्याकडे देखील आकडा आहे. लोकांनी आम्हाला 250 जागा दिल्या आहेत. आम्हाला देखील सरकार बनवण्याचं मँटेड आहे. आम्हाला हुकूमशहासोबत जायचं नाही, असं चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी ठरवलं आहे. आम्हाला लोकशाहीसोबत जायचं आहे. लोकांनी त्यांना नाकारलं आहे, तिसऱ्यांदा भाजपचं सरकार बनणार नाही, असंही राऊत म्हणाले.

वाराणसी बनारस मध्ये लेने के देने झाले तुमचे .राहुल गांधीला तुमच्यापेक्षा चांगला लीड मिळाला आहे. (Big Lead to Rahul Gandhi) वाराणसीमध्ये मोदी हारत होते त्यांनी पराभव स्वीकारला पाहिजे ते मनुष्य आहे देव नाही. Pm साठी राहुल गांधी नेतृत स्वीकारत असेल तर त्यांना हरकत नाही. आमचे मतभेद नाही आम्ही सत्ते साठी नाही तर संविधान साठी ही लढाई होती. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या व्यतिरिक्त मोदी सरकार बनू शकते का त्यांच्या ताकद आहे का बीजेपी आणि मोदी अमित शहा यांच्याकडे ताकद आहे का ? असा सवाल त्यांनी विचारला.

स्मृती इराणी हरली आहे. नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला आहे . नरेंद्र मोदी हा ब्रँड नसून ती ब्रॅण्डिं झाली आहे. नरेंद्र मोदी यांची गॅरंटी राहिली नाही. (End of modi Guarantee)आता इंडिया गटबंधन यांना मतदान दिले आहे. देशातील जनतेने तुमचा पराभव केला आहे. तुम्हाला जमिनीवरती आणले आहे. काशीमध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागला तुमच्यापेक्षा राहुल गांधी चार लाखांनी जिंकले अमित शहा चार लाखांनी जिंकले. तुम्ही सरकार बनवू शकत नाही.(Bjp Can’t Form Government) जे आकडे तुम्हाला मिळालेले आहेत ते चोरलेल्या जागा आहे. देवेंद्र फडवणीस यांनी पराभव मान्य केला पाहिजे.(Sanjay Raut On Fadnavis) विदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष पूर्ण सपाट झाला आहे. सर्वत्र महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. फडणवीस हे विदर्भाचे लीडर त्यांच्याशिवाय पान हलणार नाही असे लोक म्हणत होते.

Latest Posts

Don't Miss