Sunday, January 12, 2025

Latest Posts

संजय राऊत यांचा मोठा दावा,  विधानसभेला असं होणार नाही  

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News : मविआला विधानसभा मतदारसंघानुसार 125 जागांवर आघाडी मिळालीय त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “विधानसभेला याहून मोठ यश मिळेल.(Sanjay Raut On Vidhan sabha 2024) यावेळी अनेक ठिकाणी सत्तेच्या बळावर जागा पाडण्याचा प्रयत्न झाला. विजय चोरण्याचा प्रयत्न झाला. विधानसभेला असं होणार नाही. विधानसभेला आम्ही 180 ते 185 जागा जिंकू” (Will Win 185 seats in vidhansabha 2024)

पुढे बोलताना राऊत म्हणालेत देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्रातील नेता दिल्लीत जाऊन मोठी भूमिका बजावेल अशी आमची भूमिका होती. पण ज्या पद्धतीच दळभद्री, सूडाच, कपटाच राजकारण फडणवीसांनी केलं, त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय सभ्यता, संस्कृतीचा जो प्रवाह वाहत होता, त्याचा नाश करण्याच काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं.(Sanjay Raut on Dcm fadnavis) पेशवेकाळात आनंदीबाई होत्या, त्यांची आठवण ज्यासाठी काढली जाते, तसे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई आहेत” अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सूडाच राजकारण केलं.(Sanjay Raut Slams DCM Fadnavis) त्याचा बदला राज्यातील जनतेने घेतला. जनतेला संधी मिळाली, तेव्हा त्यांनी दाखवून दिलं. तुमच फडतूस राजकारण चालणार नाही. आता फडणवीसांच्या पुढे-मागे नाचणारे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. हातातील सत्तेचा वापर देवेंद्र फडणवीस यांनी चुकीच्या कामांसाठी केला. न्यायालयावर दबाव आणला. न्यायमुर्तींना घरी बोलवून देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीने दम दिला” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut Slams Fadnavis)

“राजकीय कामांसाठी पोलिसांचा वापर झाला. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक आहेत. मोदी-शाहंवर जितका राग नाही, तितका महाराष्ट्रातील जनतेचा फडणवीसांवर राग आहे. विदर्भात काय झालं? (Sanjay Raut on vidarbha Loksabha) नितीन गडकरींची जागा सोडली, तर विदर्भात फडणवीस यांचा भाजपा रसातळाला गेला. त्याला जबाबदार फडणवीस आहेत” असा आरोप संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्रात जाती-धर्म, सूडाच राजकारण त्यांनी केलं. राज्य रसातळाला नेलं. आमच्यावर कारवाया करण्यापेक्षा तुमच्या घरात काय चाललय ते पाहा” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“जे दोन पक्ष तुम्ही फोडले. त्यांनीच तुमच्यावर अश्रू ढाळण्याची वेळ आणली. तुम्हाला फडणवीस अजून बरच पहायच आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात तुमचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिल जाईल. तुम्ही महाराष्ट्राची, मराठी माणसाच्या स्वाभिमानाची वाट लावली. हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवेसना फोडली.(Sanjay Raut on Balasaheb Shivsena) याचा सूड सातत्याने महाराष्ट्र घेत राहिल असं संजय राऊत म्हणाले.

Latest Posts

Don't Miss