Saturday, January 11, 2025

Latest Posts

खा.राऊत भडकले : महाविकास आघाडीत ताणतणाव

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News : पुढील काही दिवसात आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकींच्या प्रचाराला वेग येणार आहे. अशात मात्र महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन घमासान सुरु आहे. (Mahavikas aghadi and mahayuti seat sharing latest news ) अनेत ठिकाणी नाराजी नाट्य बघायला मिळत आहे. तर अनेक उमेदवार जागा वाटपावरून खदखद व्यक्त करत आहेत. अशात जागावाटपावरुन उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत मविकास आघाडीतील घटक पक्षांवर चांगलेच भडकल्याचे दिसून आले आहे.(Sanjay raut slams mahavikas aghadi partners ) त्यामुळे महाविकास आघाडीतील ताणतणाव समोर आला आहे. (Trouble in mahavikas aghadi on seat sharing)

संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षावर थेट हल्लाबोल केला आहे.(Sanjay raut slams congress) काँग्रेस पक्ष आजकाल अधिक व्यस्त असल्याचा चिमटा त्यांनी काढला. काँग्रेस नेते 10-10 दिवस वेळ देत नाहीत. पण तारीख पे तारीख देतात. ते लोक कितीही व्यस्त असले तरी आम्ही त्यांना बोलावलं आहे. जागा वाटपाचा प्रश्न सोडवला पाहिजे. आम्ही पुढील तीन दिवस या मुद्दावर बसून चर्चा करणार असल्याचे राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस या तीनही महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मुंबईत बैठक होणार असल्याचे राऊतांनी स्पष्ट केले.(Mahavikas Aghadi top leader meeting soon) मुंबईमधील जागा वाटपावरील चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे. पण राज्यातील काही भागातील जागा वाटपांवर चर्चा होणे आवश्यक असल्याचे राऊतांनी सांगितले.

उद्धव ठाकरे गटाची मुंबईतील 36 जागांपैकी 20-22 जागांवर दावेदारी समोर येत आहे. मुंबईत काँग्रेस आणि शिवसेना मोठा दावा करत आहे.(Congress and shivsena claim more seat in mumbai) या दोन्ही पक्षांचा मुंबईत दबदबा आहे. काँग्रेस पण मुंबईत जास्त जागा मागत असल्याचे समोर येत आहे. शरद पवार यांचा पक्ष पण मुंबईवर लक्ष ठेवून आहे. सध्या काँग्रेस अनेक जागांवर आग्रही असल्याने जागा वाटपांचा पेच कायम आहे.

Latest Posts

Don't Miss