Saturday, January 11, 2025

Latest Posts

काँग्रेसचे संजय निरुपम शिवसेनेच्या वाटेवर

| TOR News Network | Sanjay Nirupam Latest News : काँग्रेस पक्षातील मोठे व जुने नेते पक्षाला राम राम ठोकत आहेत.अशात आता काँग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरुपम हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चिन्ह आहेत. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिलीए. (Sanjay Nirupam on the way to Shiv Sena)

काल बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांचा आमच्या पक्षात प्रवेश झाला पण त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. संजय निरुपम हे काँग्रेसवर खूपच नाराज आहेत, त्यांनी सौम्य भाषेत काँग्रेसची सर्व उतरवली आहे. त्यामुळं मला वाटतं ते येत्या दोन-तीन दिवसांत काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील. जर ते आमच्याकडं आले तर त्यांचं आम्ही स्वागत करु पण दक्षिण मुंबईची जागा कोण लढवणार याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.(Sanjay sirsat on sanjay nirupam)

शिरसाट पुढे म्हणाले, “मनसेचे नेते राज ठाकरे यांच्यामागे देखील जनाधार आहे. ते जर आमच्या सोबत येत असतील तर त्यांना सत्तेत सहभागी करुन घेणं गरजेचं आहे त्यासाठी त्यांना जागा तर सोडावीच लागेल. त्यामुळं राज ठाकरे आणि तिघे नेते मिळून याबाबत निर्णय घेतील. त्यामुळं मनसेला एक जागातरी मिळणं गरजेचं आहे आणि त्यांना ती मिळेल”

संजय निरुपम यांना कुठलीही ऑफर दिलेली नाही.(No offer to sanjay nirupam) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ते भेटले तर आहेत पण अद्याप पक्ष प्रवेशाबाबत कुठलाही चर्चा झालेली नाही. पण ते जेव्हा येतील तेव्हा त्याबाबत पाहुयात असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे.

Latest Posts

Don't Miss