Sunday, January 12, 2025

Latest Posts

संजयकाका,सना मलिक, टिंगरे, झिशान सिद्दीकींना पक्षात येताच उमेदवारी

| TOR News Network |

Ajit Pawar NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर झाली. (Ajit Pawar NCP 2nd list) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या दुसऱ्या यादीमधील सात नावं वाचून दाखवली. विशेष म्हणजे या यादीमध्ये काही काळापूर्वी तुरुंगातून जामीनीवर बाहेर आलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्येचा (Sana malik )तसेच काही दिवसांपूर्वीच हत्या झालेले नेते बाबा सिद्दीकी यांच्या मुलाचाही समावेश आहे.(Zeeshan Siddique)

शरद पवरांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातून अजित पवारांनी निशिकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.(Jayant patil vs nikshikant patil) त्यामुळे या मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे. ही लढत पाटील विरुद्ध पाटील अशी असणार असून निशिकांत पाटील यांचा कस येथे लागणार आहे.

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षाने संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आर. आर. पाटलांचे पुत्र रोहित पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.(rohit patil vs sanjaykaka patil)

नवाब मलिक यांच्या अणुशक्ती नगर मतदारसंघातून त्यांची कन्या सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार यांनी नवाब मलिक यांचा विचार केला जाणार नाही हे चुकीचं वृत्त असल्याचं विधान अनौपचारिक चर्चेत केलं आहे.(sana malik from anushaktinagar)

वांद्रे पूर्व या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार वरुण सरदेसाई यांची थेट लढत दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिदिकींशी होणार आहे. अजित पवारांच्या पक्षाने झिशान सिद्दीकींना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणीची निवडणूक अधिक रंजक होणार आहे. ( Zeeshan Siddique vs varun sardesai)

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणानंतर चर्चेत आलेले आणि आरोपीच्या मदतीसाठी धावलेले विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना अजित पवारांच्या पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. पोर्शे प्रकरणात नाव आल्याने टिंगरेंच्या उमेदवारीसंदर्भात शंका उपस्थित केली जात होती.

शिरुरमधून अजित पवारांच्या पक्षाने ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांना तर लोहा मतदारसंघातून प्रताप चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी खासदार असलेल्या चिखलीकर यांनी आजच भाजपामधून अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.

Latest Posts

Don't Miss