Sunday, January 12, 2025

Latest Posts

मग आता गोळ्या घाला ना – संजय राऊत

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खोकेगिरी आणि बोलबच्चनगिरी कमी केली आणि या राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष दिलं तर बरं होईल.(Sanjay Raut slams cm and dcm) पब्लिसिटीसाठी बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला गोळ्या घातल्या होत्या. मग आता गोळ्या घाला ना ! तुमच्या एका सहकाऱ्याची हत्या होते, त्या गुंडाना पकडण्यात येतं मग त्यांनाही गोळ्या घाला ना. हेच मुख्यमंत्री शिंदे एकेकाळी म्हणाले होते ना, की मुंबईत लॉरेन्स बिश्नोई वगैरे गँग चालणार नाही,मी बघून घेईन, मग आता बघून घ्या ना, अशा शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर कडाडून हल्ला चढवला. (Sanjay raut on Bishnoi Gang)

या हत्याकांडाचा मुख्य आरोपी गुजरातच्या एका जेलमध्ये आहे. गुजरातच्या एटीएसच्या ताब्यात असलेली व्यक्ती मुंबईतील एका हत्येची जबाबादारी घेते,ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. (Sanjay raut on baba Siddique Shot Dead) मुंबईतील संपूर्ण गुन्हेगारीचं सूत्रसंचालन गुजरातमधून होतंय हे आम्ही गेल्या कित्येक काळापासून म्हणतोय. ही घटना त्याचंच एक ज्वलंत उदाहरण आहे. सगळं काही गुजरातमधून सुरू आहे. मुंबईतून उद्योग पळवायचे, मुंबईतून पैसा पळवायचा , मुंबईतल्या माणसांना त्रास द्यायचा, त्यांच्या हत्या करायच्या, याचं सगळं सूत्रसंचान गुजरातूनमधून सुरू आहे, असा आरोप राऊतांनी केला.

गुंडांची टोळी कार्यरत आहे, अशा प्रकार हत्या होत आहेत, अशा वेळी अजित पवारांनी काही पाऊल उचललं पाहिजे ना, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. ‘ अजित दादा सिंघम आहेत, इथे एक फुल दोन हाफ सिंघम आहेत. (Sanjay raut on cm Shinde And Dcm Fadnavis) खरंतर आपल्या एका सहकाऱ्याची हत्या झाल्यावर त्यांनी निषेध व्यक्त केला, त्याशिवाय काय केलं ? फक्त निषेध व्यक्त करणं हे गांडू गिरीचं लक्ष आहे राजकारणात’ अशा शब्दांत राऊत यांनी अजित पवार यांनाही फटकारलं.

खरं म्हणजे अजित पवारांनी मुख्यमंत्र्याचा राजीनामा मागायला हवा होता, एवढ्या जवळच्या सहकाऱ्याची हत्या झाली.(Sanjay raut on ajit pawar) राज्याची कायदा-सुव्यवस्था कोलमडून पडली आहे. त्याच मंत्रीमंडळात तुम्ही बसता, तिथेच देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. तुम्ही लोकं काय करत आहात नक्की ? असा जाब राऊत यांनी विचारला.

Latest Posts

Don't Miss