Wednesday, January 15, 2025

Latest Posts

समीर भुजबळ फ्रंटफुटवर येत आहेत : छगन भुजबळ

| TOR News Network |

Chhagan Bhujbal Latest News : छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंकज आणि समीर आता तुम्ही मोठे झाला आहात. आई – वडिलांना मात्र तुम्ही लहानच असतात पण तुम्ही स्वतःचे निर्णय घ्यायला शिका, असा भावनिक वडिलकीचा सल्ला मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.(chhagan bhujbal on Sameer bhujbal) ते म्हणाले,   समीर भाऊ यांचा ५१ वा वाढदिवस आहे. खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला मुंबईत, महाराष्ट्रात काम करायचं आहे. आम्ही आहोत तुमच्या बरोबर. रात्रंदिवस मेहनत करता, नेहमी बॅक स्टेजला असायचे. आता हळूहळू फ्रंटफुटवर येत आहेत.(Sameer bhujbal coming on frontfoot) माझे त्यांना आशीर्वाद आहेत. नांदगाव करांच्या शुभेच्छा आशीर्वाद त्यांना लाभो, असं छगन भुजबळ म्हणाले.

 छगन भुजबळ नाशिकच्या नांदगाव येथे समीर भुजबळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आयोजित अजय – अतुल यांच्या साद स्वरांची संगीत मैफिल या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. गल्ली ते दिल्लीपर्यंत आपण कामाच्या माध्यमातून पोहोचलेलो आहे.जनतेची सेवा करा, समाजकारण करा आणि त्यातून राजकारण करा जनता नेहमी तुमच्या पाठीशी राहील असेही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

सामाजिक काम करताना कसं काय काम करायचं हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक गोष्ट मला विचारण्याची आवश्यकता नाही. सामाजिक काम पुढं नेण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली पाहिजे. गोरगरिबांच्या उपयोगी पडणं हे महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा. राजकारण करायचं आहे ते समाज सेवा करण्यासाठी करायचं आहे हे विसरु नका, असं छगन भुजबळ म्हणाले

मतदारसंघातून  समीर भुजबळ हे विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. (Sameer bhujbal to contest vidhansabha election)मंत्री भुजबळ यांनी देखील तसे संकेत समीर यांच्या वाढदिवसाच्या ट्विट द्वारे शुभेच्छा देताना दिले होते. त्यामुळे भुजबळांच्या एन्ट्रीची नांदगाव शहरात चर्चा सुरू झाली.

Latest Posts

Don't Miss