Saturday, January 18, 2025

Latest Posts

अजय जडेजा सध्या काय करतो? पूर्वी क्रिकेटर नंतर सिनेमामध्ये आणि आता…

१९९२ ते २००५ या सालात क्रिकेट प्रेमींचे मने जिंकणारा भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा (Nowadays where is Ajay Jadeja) आता परत चर्चेत आला आहे. इतके वर्ष जडेजा होता कुठे आणि सध्या तो काय करतो त्या बद्दल….

सध्या क्रिकेटचा विश्वचषक सुरु आहे. यात बलाढ्य संघासोबतच कमी अनुभव असलेले संघ देखील आपले भाग्य आजमावत असून विजय देखील प्राप्त करत आहेत.सध्या सर्वत्र चर्चा आहे ती अफगाणिस्तानच्या संघाची. अफगाणिस्तानने यंदाच्या विश्वचषकात दोन मोठ्या संघाचा पराभव करत आनेकांना धक्का दिला आहे.१५ आक्टोबरला अफगाणिस्तानने गतविजेत्या इग्लंडला ६९ धावांनी पराभूत केले. आपल्या पहिल्या  वहिल्या विजयामुळे अफगाणिस्तान संघाचे मनोबल वाढले आहे. अशात त्यानंतर अफगाणिस्ताने पाकिस्तान सारख्या अनुभवी संघालाही धुळ चारली आहे.त्यामुळे एकाकी अफगाणिस्तानच्या संघात परिवर्तन झाले कसे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अफगाणिस्तानचा संघ अनेकदा मोठ्या संघांच्या अगदी जवळ येऊन त्यांना पराभूत करण्यास अपयशी ठरत होता.मात्र आता अफगाणिस्तानच्या संघाने केलेल्या कामगिरीमुळे त्या संघाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. हे परिवर्तन झाले कसे याचा शोध घेतल्यास या मागे भारतीय क्रिकेटपटूंचा हात असल्याचे बोल्ले जात आहे.अन् तो भारतीय क्रिकेटपटूं म्हणजे अडज जडेजा. होय अजय जडेजा सध्या अफगाणिस्तान संघाचा मेंटॉर आहे.त्याचा क्रिकेटचा दंडगा अनुभव अफगाणिस्तान संघाला होत आहे.विशेष म्हणजे जडेजाने सिनेमात देखील आपले भाग्य आजमावले आहे.  

Latest Posts

Don't Miss