Thursday, January 16, 2025

Latest Posts

सदावर्ते दाम्पत्याचे एसटी बँकेवरील संचालकपद रद्द

Theonlinereporter.com – May 8, 2024 

Gunaratna Sadavarte Latest News : सहकार विभागाने एक मोठा निर्णय घेत सदावर्ते दाम्पत्यावर कारवाई केली आहे. जेव्हापासून एसटी बँकेचा कारभार सदावर्ते यांच्या हातात गेल्या तेव्हापासूनच ते चुकीचा कारभार करत असल्याचा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता. (Mismanagement by gunaratna sadarvte) त्यानंतर सदावर्तेंनी नियम मोडल्याचं निरीक्षण नोंदवत सहकार विभागाने दोघांवर ही कारवाई केली. (The cooperative department took action on sadavarte couple)

तब्बल चार हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात एसटी बँकेतून ४७९ कोटींच्या ठेवी ठेवीदारांनी काढल्या आहेत.(St Co-operative Bank Latest News) कर्ज आणि ठेवी यांचा ताळमेळ बसत नसल्याने कर्जवाटपावर मर्यादा आल्या आहेत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे खाते असलेली बँक वाचवण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करावी’, अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली होती.

राज्यातील ५० हून अधिक शाखांमध्ये ६२ हजार एसटी कर्मचारी बँकेचे खातेदार आहेत. बँकेत नवे संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर व्यवस्थापनात हुकूमशाही सुरू आहे. (Dictatorship by sadarvate) नियम डावलून बँकेत ३७ जणांची भर्ती करण्यात आली. (Recruitment of 37 people in the bank by breaking rules) ठेवी काढल्याने सीडी रेशो ९५.३५ टक्क्यांवर गेला आहे. राज्य सरकारच्या सहकार खात्याचे बँकेकडील दुर्लक्ष याला जबाबदार आहे. सभासदांनी मागणी केल्यानंतर बैठक ही लावण्यात येत नाही. संचालकांच्या मताशिवाय कर्जवाटप होत असल्याने भ्रष्टाचाराचे आरोप बरगे यांनी केले होते.

गुणरत्न सदावर्ते यांचे मेहुणे सौरभ पाटील यांची स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केल्यापासून बँकेचा व्यवहार तोट्यात आला आहे. (Sadarvate appoint relatives on bank body) सदावर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनमानी निर्णयांमध्ये सभासदांनी १८० कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या. त्यामुळे सदावर्ते व त्यांच्या पत्नीला बँकेच्या तांत्रिक मंडळावरून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे विधान परिषदेचे सदस्य अनिल परब यांनी केली होती. (Anil Parab Demand to remove sadarvate couple from removed from board)

Latest Posts

Don't Miss