Saturday, January 18, 2025

Latest Posts

आरएसएसच्या विवेकने राष्ट्रवादीलाच जबाबदार धरले

| TOR News Network |

RSS Blames Ajit Pawar NCP For BJP Poor Show : आरएसएसशी संबंधित असलेल्या ‘विवेक’ या साप्ताहिकाने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणपकीत झालेल्या पराभवाला राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणे महागात पडल्याचे म्हटलं आहे. (Rss Vivek Weekly Blam NCP For Loaksabha Poor Show) विशेष म्हणजे यापूर्वीही संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’नेही  पराभवाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडले होते. (After Organiser Vivek Blam NCP ) संघाशी संबंधित साप्ताहिकाने राष्ट्रवादीला जबाबदार धरल्याने खळबळ उडाली आहे. (RSS Vivek Weekly On Ajit Pawar NCP)

‘विवेक’मधून अजित पवारांच्या गटावर टीका करताना, “हिंदुत्व मानणारा कार्यकर्ता आज खचलेला नाही, तर हरवलेला आहे, संभ्रमात आहेत,” असं म्हटलं आहे. “पक्षाच्या मूळ कार्यकर्त्याला स्थान काय आणि पक्षामध्ये बाहेरून आलेल्यांना स्थान काय, याचा विचार होण्याची गरज आहे.(RSS Vivek Weekly Slams BJP) याचा अर्थ बाहेरून आलेला प्रत्येक जण चुकीचा असा नाही,” असंही ‘विवेक’मध्ये म्हटलं आहे. “लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून,” असं म्हणत ‘विवेक’ने संघ आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या मनातील खल बोलून दाखवली आहे.(RSS Vivek On Bjp Worker)

“राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे .(BJP Worker Not Happy to Take NCP Along) याची जाणीव भाजपा नेत्यांना नाही असे नाही. अलीकडेच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत याबाबत भाष्य केले होतेच,” असं ‘विवेक’ने म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, “शिवसेनेने पुन्हा युतीत येणे, त्यासाठी शिवसेनेत घडलेले अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या. हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्याने आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने बारीकसारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचे मतदारांना पटले होते.(Voters Did Not Like the BJP Political strategy) मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचे चित्र आहे,” असं विश्लेषण ‘विवेक’ने केलं आहे.(Vivek Weekly Analysis on Loksabha 2024)

Latest Posts

Don't Miss