Thursday, January 16, 2025

Latest Posts

रोहित पवारांचा गैप्यस्फोटः भाजपचा अंतर्गत सर्व्हे फोडल

| TOR News Network |

Rohit Pawar Latest News : आगामी विधानसभा निवडणुक पाहता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महायुतीतही वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. या निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोण हरणार याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत.  अशातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा खुलासा केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा सुपडा साफ होणार असून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाला केवळ 100 च्या आसपास जागा मिळणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत भाजपचा अंतर्गत सर्व्हे फोडला आहे. या सर्वेमुळे भाजपचे टेन्शन वाढणार आहे.

“एका internal source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यामध्ये अजितदादांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे साहेबांच्या गटाला १७-२२ जागा आणि भाजपला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत.

भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर ६ ते ७ जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिलीय.

#कर्जत_जामखेड संदर्भात तर “कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको”, असं सांगितल्याने #कर्जत_जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या #महाकाय  शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत-जामखेडकर #स्वाभिमान आणि #निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वास आहे.”

Latest Posts

Don't Miss