Saturday, January 18, 2025

Latest Posts

रोहित पवार यांच्या आईचं खळबळजनक विधान

| TOR News Network |

Pawar Family Latest News : राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आणि सुरू झालं आरोप-प्रत्यारोपांच राजकारण. लोकसभा निवडणूकीची घोषणा होताच अजित पवार यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार उभं करणार असल्याचं जाहीर केलं.अशात आता रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी एक मोठे विधान केले आहे. यात त्यांनी पवार कुटुंबाच्या फुटी संदर्भात भाष्य केले आहे. (Rohit Pawar Mother Big Statement)

पवार कुटूंब पुन्हा एकत्र येणं शक्य नाही, (Pawar Family will never come together again) बाजूला गेलेत, ते अजितदादांना एकत्र येऊ देणार नाहीत, असं धक्कादायक विधान पवार कुटुंबातील सून आणि आमदार रोहित पवार यांची आई, सुनंदा पवार यांनी केलं आहे. (Sunanda pawar on pawar Family)

मात्र बारामती निवडणुकीत विजय झाला तो सुप्रिया सुळे यांचाच. (Supriya sule won from baramati loksabha) त्यांना सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने हरवलं. झालं गेलं गंगेला मिळालं अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतल्यामुळे आता पवार कुटुंबातील दरी साधली जाईल का, पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल का असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात घोळू लागले आहेत. मात्र आमदार रोहित पवारांची आई आणि पवार कुटुंबातील सून, सुनंदा पवार यांच्या बोलण्यावरून हे सध्या तरी शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

खरंतर इलेक्शनची जेव्हा घोषणा झाली आणि बारामतीमधील उमेदवाराची जेव्हा घोषणा झाली, त्याच्याआधीपासूनच आमचं कुटुंब खूप वेगळ्या मनस्थितीतून गेलं आहे. त्यामुळे विलक्षण तणाव होता. (Was Stress in Pawar Family) निवडणुकीला सामोरं जायचं होतं. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच आम्ही ठरवलं होतं की ( शरद पवार) साहेबांच्या सोबत रहायचं. 70 टक्के कुटूंब साहेबांसोबत आहे आणि वैचारिक भूमिका बदलल्यामुळे एक कुटुंब बाजूला गेलं आहे. (70 percentage family with sharad pawar) एेरवी  सण-समारंभाला एकत्र येणं ठीक आहे पण आता वैचारिक मतभेद एवढे झाले आहेत, मन एवढी दुखावली आहेत, भाषेचा स्तर खूप खाली गेला आहे, त्यामुळे जखमा खूप झालेल्या आहेत, त्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणं शक्य नाहीये. अजितदादा ज्या भूमिकेच्या बाजूला गेलेत, ते अजितदादांना एकत्र येऊ देणार नाहीत, असं त्या म्हणाल्या.रोहित पवारांवर आता पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे अशी चर्चा आहे. (Big responsibility on rohit pawar) रोहित ती नक्कीच पार पाडतील सा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बारामती येताच अगोदर दादांच्या घरी

सुप्रिया सुळे या निवडून येताच पहिल्यांदाच बारामतीच्या दौऱ्यावर आल्या. बारामतीत त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. पण त्यांनी आल्या आल्या अगोदर त्यांनी काठेवाडी गाठलं. अजित पवार यांच्या आई आणि त्यांच्या काकी आशाताई पवार यांची भेट घेतली. (Supriya Sule Visit Ajit Pawar House) त्यांनी त्यांचे आशिर्वाद घेतले. त्यांच्या या कृतीने सर्वांचीच मनं जिंकली. तर राजकारणात विरोध असला तरी त्याच्यापुढे नात्याचा दोर मजबूत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

Latest Posts

Don't Miss