Sunday, January 12, 2025

Latest Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर गंभीर आरोप 

Theonlinereporter.com – May 7, 2024 

Rohit Pawar On Ajit Pawar : रोहित पवार यांनी थेट अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. (Serious allegation on ajit pawar) यात त्यांनी लोकसभेच्या मतदावाच्या पूर्वसंध्येला पैसे वाटल्याचा आरोप केला आहे.(Befor voting Money distributed by ajit pawar) ते म्हणाले अजितदादा मित्रमंडळाकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्यात आलं. भोरला गाडी फोडण्यात आली, त्यात पैसा होता. मावळचे आमदार, नेते आणि त्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते त्या गाडीत पैसे घेऊन होते असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केलाय.(Rohit Pawar serious charges on ajit pawar) 

“बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झालं. (Money distributed in baramati) काही ठिकाणी प्रत्येक मतासाठी 2500 रुपये,(2,500 for single vote) काही ठिकाणी 3 हजार रुपये, काही ठिकाणी 4 हजार रुपये वाटले गेले. जात, धर्म, गरीब, श्रीमंत बघून पैसा वाटला गेला” असा आरोप रोहित पवार यांनी केला. (rohit pawar serious charges on ajit pawar)

“पीडीसीसी बँक गरीबाला 5 वाजता बंद होते. पण पैसे वाटपासाठी रात्री 1-2 वाजेपर्यंत सुरु होती.(Bank was open late night in baramati) पीडीसीसी बँक, त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पैसे वाटण्यासाठी वापर केला. (pdcc bank kept open to take money for voters) अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा हा सामना आहे. साहेब, ताईंच्याबाजूने जनशक्ती उभी राहिल असा आम्हाला विश्वास आहे” असं रोहित पवार म्हणाले. (Janshakti behind supriya tai)

पैसा वाटण्याची वेळ का आली? यावर रोहित पवार म्हणाले की, “लोकांना माहितीय 2014 पर्यंत सत्ता पवार साहेबांमुळे आली. सत्ता आल्यानंतर अजित पवारांना मंत्रीपद मिळालं, मग त्यांनी विकास केला” “2019 मध्ये अजितदादांचा पराक्रम नसताना सुद्धा, साहेबांमुळे सत्ता आली. दादांना पद मिळालं, त्यानंतर त्यांनी निधी आणला. तुम्ही स्वत:च्या हिमतीवर काय केलं हे सांगता येत नाही, मग लोकं तुमच्याबाजूने कशी येणार? साहेबांना सोडलं, विचारांना सोडलं. विकास साहेबांनी केला. लोक भाविनक आहेत” असं रोहित पवार म्हणाले.

Latest Posts

Don't Miss