Saturday, January 11, 2025

Latest Posts

राज ठाकरे तसा निर्णय घेणार नाहीत

| TOR News Network | Rohit Pawar On Raj Thackeray  : मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे मनसे आणि भाजप युती होणार असल्याची चर्चा होत आहे. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे अमिल शाह यांना भेटले. पण त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. स्वाभिमानी मराठी माणूस दिल्लीला जाऊन वाटाघाटी करीत नाहीत.(Rohit Pawar on Raj Thackeray Amit Shah Meeting)

रोहित पवार हे मालेगावच्या दौऱ्यावर आहेत.त्यांच्याशी तेथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला.यावेळी रोहित पवार म्हणालेत 2019 मध्ये राज ठाकरे हे भाजपा विरोधात बोलत होते. आता जर त्यांनी काही निर्णय घेतला तर 2019 चे भाषण आणि आत्ताचे भाषण लोक तुलना करतील. त्यात तफावत दिसली तर राजकीय तफावत दिसेल. मला असे वाटते की राज ठाकरे तसा निर्णय घेणार नाहीत, असं रोहित पवार म्हणाले.

जागावाटपाबद्दल पवार म्हणालेत

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात जागा वाटपाचा मुद्दा वारंवार चर्चेत येत आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप कधी होणार? यावर रोहित पवांरांनी आपलं मत मांडलं. दोन दिवसात जागा वाटपाचा तिढा संपेल. (in Next 2 days list will be final) कदाचित आज- उद्या काही नावे घोषित होतील, असं रोहित पवारांनी म्हटलं.

यंदा तसे काही घडणार नाही

वंचित महाविकास आघाडीत येणार का? यावर रोहित पवारांनी स्पष्ट भाष्य केलं. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. (Rohit Pawan on Vanchi bahujan aghadi)योग्य तो निर्णय घेतला जाईल. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येतली अशी अपेक्षा आहे. दुर्दैवाने वंचित ज्या ठिकाणी लढले त्या ठिकाणी मताधिक्य आणि विभाजन पाहिलं तर त्याचा फायदा भाजपला झाला आहे. यंदा ते घडणार नाही. आंबेडकरसाहेब योग्य तो निर्णय घेतील, असं रोहित पवार म्हणाले.(prakash ambedkar will take right dicussion)

 चिन्हाबाबत बोलताना म्हणाले

राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हावर सुप्रीम कोर्टने निकाल दिला. त्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाने दिलेला नर्णय स्वागतार्ह आहे. घड्याळ चिन्ह वापरायला अटी शर्ती दिल्या आहेत. भाजप अजित दादाच्या पक्षाला वेगळ्या पद्धतीने वागवत आहे. अटी ताटित अडकावत आहे. नंतर ते चिन्ह राहील असे वाटत नाही. हे काहींना कळले असून ते किती दिवस त्या पक्षात राहतील ते येणाऱ्या काळात दिसेल, असं रोहित पवार म्हणाले.

 भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवायचे आहे

रोहित पवार सध्या उत्तर महाराष्ट्र दौरा करत आहेत. सामान्यांशी ते संवाद साधत आहेत. शेतकरी ट्रॅक्टरसाठी अनुदान अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. अख्खा महाराष्ट्र अडचणीत आहे. भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवायचे आहे, असं रोहित पवार यांनी या दौऱ्या दरम्यान म्हटलं.(want to keep bjp out of power)

Latest Posts

Don't Miss