Wednesday, January 15, 2025

Latest Posts

फोन टॅपिंगमुळे लोकसभा- विधानसभा निवडणुकीत फायदा होईल

| TOR News Network | Rohit Pawar On BJP : राज्यातील दिग्गज नेते महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहेत. त्याचा थेट फटका काँग्रेस, ठाकरे गटाच्या शिवसेनेला व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला बसत आहे. यावरुन थेट महाविकास आघाडीला फटका बसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे.(Rohit Pawar Slams BJP)

महाविकास आघाडीतून (Mahavikas Aaghadi) जे नेते बाहेर पडतील, यावरून महाविकास आघाडीला गळती नाही. तर भाजपमधल्या प्रवेशाने भाजप नेत्यांची डोके दुखी वाढेल. असे म्हणत पवारसाहेब यांच्यावर बोलण्याशिवाय भाजपचं गाडं पुढे चालतं नाही, येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम होईल, असा दावाही रोहित पवार यांनी केला.

काही नंबरफोन टॅपिंगला दिले असावेत

भाजप सरकार कायदा कधी बघत नाही. रश्मी शुक्ला यांच्यावर या पूर्वी ही कारवाई करण्यात आली. फोन टॅपिंगमुळे लोकसभा- विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, म्हणून रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देत असावेत.(Rashmi Shukla Phone Tapping) माझा अंदाजाने काही नंबरफोन टॅपिंगला दिले असावेत, त्यात माझाही नंबर असावा, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली.(Phone tapping Benefit to bjp)

यवतमाळात रोहित पवारांची शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासोबत दिवाळी

पवार विरूद्ध पवार लढाई होऊ नये

“पवार विरूद्ध पवार हेच भाजपला हवं होतं, मात्र चाणक्य लोकं मतांतून निर्णय घेतील. दादांच्या भूमिकेबद्दल मी काय बोलणार ? पवार विरूद्ध पवार लढाई होऊ नये या मताचा मी आहे. मात्र भाजपच्या सांगण्यावरून दादा निर्णय घेत असतील तर कठीण आहे,” असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

Latest Posts

Don't Miss