Monday, January 13, 2025

Latest Posts

रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेसंदर्भात केले स्टिंग ऑपरेशन

| TOR News Network | Rohini Khadse Sting Operation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुक्ताईनगर येथे सभा झाली.यावेळी त्यांनी विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण केले.त्यानंतर त्यांची सभा झाली, या सभेला मतदारसंघातील सर्व बचत गट महिला आल्या होत्या.मात्र या महिलांना सक्तीने आणल्याचा दावा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला आहे. त्यासंबंधीची एक ऑडियो क्लिपही त्यांनी समाज माध्यमांवर शेअर केली आहे, ज्यामध्ये त्या स्वत: स्टिंग ऑपरेशन करताना दिसत आहेत.(Rohini Khadse Audio Clip goes Viral)

सभेला न आल्यास ५० रु दंड

जळगावातील मुक्ताईनगरात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा झाली. यावेळी कार्यक्रमाला येण्यासाठी बचत गटातील महिलांना सक्ती करण्यात आल्याचा दावा रोहिणी खडसे यांनी केला आहे. जी महिला येणार नाही तिच्याकडून ५० रुपये दंड आकारण्यात येईल, असाही दावा त्यांनी केला आहे. (50 Rupees Fine For Mahila bachat Gat Women) त्यासंबंधीची एक ऑडियो क्लिप त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(Rohini Khadse Share Audio clip) तसेच, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देतील, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का

या ऑडियो क्लिपमध्ये रोहिणी खडसे या स्वत: बचत गटातील महिला बनून फोनवरुन संबंधित महिलेशी बोलताना ऐकू येतात. त्यानंतर त्या सांगतात की मी रोहिणी खडसे बोलतेय. अशा प्रकारे दमदाटीकरुन महिलांना घेऊन जाणं चुकीचं आहे, कशासाठी ५० रुपये दंड आकारताय, कोणी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का, असा सवालही त्यांनी त्या महिलेला केला.(Who Said to fine 50 rs) तसेच, दंड आकारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असं म्हणत रोहिणी खडसे यांनी त्या महिलेला खडसावलं.

अशी कारणे ऐकून घेतली जाणार नाही

‘मुख्यमंत्र्यांच्या मुक्ताईनगर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी महिला बचत गटाच्या महिलांना जबरदस्ती केली जातेय. नाही आलात तर कोणतेही कारण चालणार नाही. (No Excuse For Cm Sabha )उपस्थित नाही राहीला तर ५० रुपये दंड आकारण्यात येईल. आजारी आहे, लग्न आहे, जमले नाही अशी कारणे ऐकून घेतली जाणार नाही. मला दंड घेता येतो. अशा प्रकारची धमकी एका महिला कार्यकर्ती देत असल्याचे मला सकाळपासून किमान ७-८ महिलांनी सांगितले. त्यानंतर मी त्यांच्याकडून संबंधीत महिलेचा नंबर घेतला. त्यानंतर मी त्या महिलेशी सुरुवातीला डमी नावाने फोनवर केलेला असे खडसे म्हणाल्या.

Latest Posts

Don't Miss