Thursday, January 16, 2025

Latest Posts

हा भाजपचा नेता मुंबईतील सर्वात श्रीमंत उमेदवार

Theonlinereporter.com – May 15, 2024 

Mumbai Lok Sabha Richest Candidate News : २० मे रोजी महाराष्ट्रात लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचे मतदान होत आहे. (On 20 may voting in mumbai) यात मुंबईच्या सहा लोकसभा मतदार क्षेत्राचा समावेश आहे. (Six lok Sabha canditate from mumbai) त्याचवेळी ‘मुंबई वोट्स’ या संस्थेने मुंबईतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? (Who is the richest candidate from mumbai) कोणत्या उमेदवाराची संपत्ती किती वाढली? कोणत्या उमेदवारावर किती गुन्हे दाखल आहेत? याचा अहवाल तयार केला आहे.

‘मुंबई वोट्स’ या संस्थेच्या अहवालानुसार केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पीयूष गोयल सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. (Piyush Goyel richest candidate from mumbai) गोयल यांच्याकडे ११०.९६ कोटींची संपत्ती आहे. (Piyush goyel owns 110 cr property) तसेच विविध गुन्ह्यांची नोंद असलेले सर्वाधिक उमेदवार उत्तर मध्य मुंबईत आहे, असे या संस्थेने म्हटले आहे.

पीयूष गोयल यांच्यानंतर रवींद्र वायकर मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार आहेत. (Ravindra waiker property news) त्यांच्याकडे ५४.२१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत. तसेच भारत जन आधार पक्षाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुरिंदर अरोरा यांच्याकडे ४०.४७ कोटीं संपत्ती आहे.

सर्वाधिक संपत्ती खासदार श्रीकांत शिंदे यांची वाढली आहे.(Shrikant shinde property news) त्यांच्या संपत्ती वाढीचा वेग ६६९ टक्के आहे. त्यानंतर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल शेवाळे यांची संपत्ती वाढली आहे. त्यांच्या संपत्तीत वाढ ६१९ टक्के राहिली. काँग्रेसचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भूषण पाटील यांची संपत्ती ४८३ टक्के वाढली आहे. ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. परंतु गेल्या पाच वर्षांत सर्वसामान्य नागरिकांच्या संपत्ती वाढीचा दर केवळ ३.५ टक्के आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक उमेदवार उत्तर मध्य मुंबईत आहेत. (Most criminals candidates from North Central Mumbai) तर पालघरमध्ये सर्वात कमी उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण २७ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघातील १० उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.

Latest Posts

Don't Miss