Saturday, January 11, 2025

Latest Posts

प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू

Republic Day Work Begin In Nagpur : जिल्हा प्रशासनाने प्रजासत्ताक दिनाचे नियोजन सुरू केले आहे. कस्तुरचंद पार्कमध्ये मुख्य कार्यक्रम होणार आहे. सकाळी ९.१५ वाजता उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून ते जिल्ह्यातील जनतेला संबोधितही करणार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी आज विभागप्रमुखांची भेट घेऊन आवश्यक निर्देश दिले. या वेळी 26 जानेवारी रोजी सीताबुर्डी किल्ला जनतेसाठी खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीत उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी विविध विभागामार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

Latest Posts

Don't Miss