Monday, November 18, 2024

Latest Posts

टीम इंडियाला मिळाली हार्दिक पंड्याची रिप्लेसमेंट

Indian Cricket Team Latest News : शिवम दुबे हे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तुफान फटकेबाजी आणि भेदक मारा करुन केलेली अष्टपैलू कामगिरी. (Shivam dube replacement for hardik pandya ) हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त असताना त्याला भारतीय संघात स्थान मिळालंय आणि या तो या संधीचं सोनं करतोय.अफगाणिस्तानविरुद्धच्या सुरु असलेल्या सुरुवातीच्या दोन टी-२० सामन्यांमध्ये त्याने तुफानी अर्धशतकं झळकावली आहेत.त्याच्या या दमदार खेळीमुळे हार्दिक पंड्याचं संघातील स्थान धोक्यात येऊ शकतं. (Team india got pandyas replacement )

शिवम दुबेमुळे हार्दिकची होणार सुट्टी?

येत्या काही महिन्यात भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा खेळायची आहे. या स्पर्धेपूर्वी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरु असलेली टी-२० मालिका ही शेवटची मालिका असणार आहे.दरम्यान हार्दिक पंड्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर आहे. त्याच्या जागी संधी मिळालेल्या शिवम दुबेने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावलं आहे.पहिल्या सामन्यात त्याने ४० चेंडूंचा सामना करत ६० धावा केल्या.यासह त्याने १ विकेटही घेतला. तर दुसऱ्या सामन्यात त्याने अवघ्या ३२ चेंडूंचा सामना करत ६३ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. तर गोलंदाजी करताना १ गडी देखील बाद केला.

भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगने गेली बरेच वर्ष मध्यक्रमात मोलाची भूमिका बजावली. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी तो दोन्ही क्षेत्रात संघासाठी मॅचविनर ठरला. तुम्ही जर शिवम दुबेची फलंदाजी शैली पाहिली तर तुम्हाला त्याच्या फलंदाजीत युवराज सिंगची झलक दिसेल.अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने १० व्या षटकात सलग ३ षटकार मारले. यादरम्यान त्याने लेग साईडच्या दिशेने गगनचुंबी षटकार मारले. हे षटकार पाहून अनेकांना युवराजने २००७ टी-२० वर्ल्ड वर्ल्डकप स्पर्धेत मारलेल्या ६ षटकारांची आठवण झाली असेल.

Latest Posts

Don't Miss