Theonlinereporter.com – May 8, 2024
Lok Sabha Voting Percentage 2024 : तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 11 लोकसभेच्या मतदारसंघात उदयनराजे, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, नारायण राणे, प्रणिती शिंदेसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे.(Third phase voting percentage) संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद झालीय. कोल्हापुरात सर्वाधिक मतदान झालं असून बारामतीत सर्वात कमी मतदान झालं आहे.(Higest voting in kolhapur lowest in baramati)
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 5 जागांसाठी मतदान झालं. तिथं 61.9 टक्के मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 8 जागांसाठी मतदान झालं.(Maharashtra voting percentage) तेव्हा मतदानाची टक्केवारी 59.6 टक्के होती. (Loksabha 2024 voting percentage) आणि तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 11 जागांसाठी मतदान पार पडलं. 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 53.40 टक्के मतदानाची नोंद झालीय. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, संध्या 5 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापुरात 63.71 टक्के झालंय. (Kolhapur voting percentage) तर सर्वात कमी मतदान बारामतीत झालंय. बारामतीत 45.68 टक्के मतदानाची नोंद झालीय. (Baramati voting percentage) काँग्रेसनं आमदारांना मतदानासाठी खास जबाबदारी सोपवली होती. त्याचाच परिणाम कोल्हापुरात आकडेवारीवर दिसलाय.
देशात सर्वाधिक मतदान आसाममध्ये
महाराष्ट्रातल्या 11 जागांसह देशभरात तिसऱ्या टप्प्यात एकूण 93 जागांवर मतदान पार पडलं. भारतात तिसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झालंय, ज्यात सर्वाधिक मतदान पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये झालंय. बंगालमध्ये 73.93 टक्के इतकं मतदान झालंय. उत्तर प्रदेशात 55.13 टक्के, मध्य प्रदेशात 62.28 टक्के मतदान, छत्तीसगडमध्ये 66.87 टक्के, बिहारमध्ये 56.01 टक्के मतदान, आसाममध्ये 74.86 टक्के मतदान झालं. (Highest voting percentage in india) तर सर्वात कमी मतदान महाराष्ट्रातच झालंय. महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.40 टक्के मतदान झालं. आतापर्यंत देशभरात 284 जागांवर मतदान झालंय. आता चौथ्या टप्प्याचं मतदान 13 तारखेला आहे. ज्यात महाराष्ट्रच्या 11 जागांवर मतदान असेल. (Voting of fourth phase on 13 may)