| TOR News Network |
Sharad Pawar Latest News : यंदाची विधानसभा निवडणूक ही आता पर्यंत झालेल्या निवडणुकांपेक्षा जरा वेगळी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतच फुट पडल्यानंतर आता ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. लोकसभेत महायुतीला बसलेल्या फटक्यानंतर महाविकास आघाडीत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची रीघ लागली आहे.(Aspirants first preference to sharad pawar ncp) अर्जांचा पाऊस पडला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून इच्छुकांनी उमेदवारासाठी थोरल्या पवारांना साकडं घातलं आहे. (Aspirants line to contest election from sharad pawar ncp) या उमेदवारांकडून एक खास बाँड पण लिहून घेण्यात आला आहे. त्याची जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभेला 85 ते 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. 85 ते 90 जागांसाठी 1350 इच्छुक उमेदवारांचे पक्षाकडे अर्ज प्राप्त झाले आहे.(1350 Aspirants application to sharad pawar ncp) राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाट्याला येणाऱ्या राखीव जागांसाठी जास्त अर्ज आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये मोहोळ, फलटण, दिंडोरी, उदगीर, भुसावळ, मेहकर, मूर्तिजापुर, उमरेड, शहापूर, अंबरनाथ, माळशिरस विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
इच्छुक उमेदवारांपैकी काही जणांनी थेट 100 रुपयांच्या बाँड पेपर उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष लढणार नसल्याचं आश्वासन लिहून दिलं आहे.(Candidate affidavit on the bond not to contest independent )उमेदवारांनी बाँडवर प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. राज्यातील 288 जागांपैकी कोणत्याही जागेसाठी आपल्या नावाचा विचार करण्यात आला नाही तर आपण बंडाळी करणार नाही. अपक्ष म्हणून निवडणूक लढणार नाही. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा देईल, असे उमेदवारांनी बाँडवर लिहून दिले आहे.
सगळ्यात जास्त देवळाली विधानसभा मतदारसंघात अर्ज आले आहेत. देवळाली मतदारसंघात 38 जणांनी अर्ज केले आहेत. नवाब मलिक यांच्या मतदारसंघात अणुशक्तीनगर विधानसभेत 9 जण इच्छुक आहेत तर मंत्री अनिल पाटील यांच्या अमळनेर विधानसभा मतदारसंघात 13 जण इच्छुक आहेत. राज्यातील इतर मतदारसंघातून पण अनेक उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. यावेळी चार पक्ष, अपक्ष आणि छोटे पक्ष मिळून अनेक उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात असतील.