Sunday, January 12, 2025

Latest Posts

मी माझ्या पत्नीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे

काय आहे कारण काय म्हणाले रेमंडचे एमडी Gautam Singhania

कापड व्यवसायात आपली मक्तेदारी निर्माण करणाऱ्या रेमंड कंपनीचे एमडी व देशातील प्रसिध्द उद्योगपती गौतम सिंघानिया हे चर्चेतील व्यक्तिमत्व आहे. मात्र यंदा त्यांची एक भावनिक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.त्यांनी आपला ३२ वर्षांचा संसार संपुष्टात आल्याची घोषणा करत त्या मागचे कारण एक्सवर पोस्ट केले आहे. मी आणि माझ्या पत्नीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आसल्याचे त्यांनी म्हटंले आहे. (Billionaire Gautam Singhania Announced Separation From Wife Navaz Modi)

 रेमंड कंपनीचे एमडी गौतम सिंघानिया यांचा विवाह 32 वर्षांपूर्वी नवाज मोदी यांच्या बरोबर झाला होता.त्यांना निहारिका आणि निसा या दोन मुली आहेत.त्यांचा संसाध गेल्या 32 वर्षांपासून सुखाने नांदत होता.मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात दुरावा निर्माण होत असल्याची चर्चा होती.त्यालाच आता गौतम सिंघानिया यांनी पूर्ण विराम दिला आहे.त्यांनी आपल्या एक्स अकांऊटवर एक भावनीक पोस्ट शेअर केली आहे.ते त्यात म्हणाले यंदाची दिवाळी पूर्वीसारखी असणार नाही. नवाज आणि मी इथून पुढे वेगळे मार्ग पत्करले आहेत. आम्ही एकमेकांपासून विभक्त होत आहोत. निहारिका आणि निसा या आमच्या दोन मुलींसाठी आम्हाला जे सर्वोत्तम करता येईल ते करत राहू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या काही घटना दुर्दैवी होत्या. मी त्यावर विचार केला. आमच्या आयुष्याबाबत अनेक बिनबुडाच्या गोष्टी आणि अफवा पसरवण्यात आल्या. त्या सगळ्या आमच्या हितचिंतकांनी पसरवल्या नाहीत हे मला माहीत आहे. मात्र आम्ही म्हणजे मी आणि माझ्या पत्नी नवाजने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या आयुष्यात हिऱ्याप्रमाणे आलेल्या आमच्या दोन मुली निहारिका आणि निसा यांच्यासाठी आम्ही आमची कर्तव्यं पार पाडू. असं म्हणत एक भावनिक पोस्ट गौतम सिंघानिया यांनी लिहिली आहे. देशातचं नव्हे तर परदेशात ही रेमंड कंपनीच्या कापडाला मोठी मागणी आहे.रेमंड कंपनीची उलाढाल अरबो मध्ये आहे.भारतात लग्न समारंभ असल्यास सर्व प्रथम कापड खरेदीत रेमंडचं नावाचा विचाक केला जातो.

 

 

Latest Posts

Don't Miss