Monday, November 18, 2024

Latest Posts

रवी राणा हे छपरी नेते, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा

| TOR News Network |

Ravi Rana Latest News : अमरावतीत सध्या राणा विरूद्ध अडसूळ यांच्यातला वाद परत एकदा चव्हाट्यावर आला आहे.  (Ravi Rana Vs Abhijit Adsul) शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनी रवी राणा यांचा उल्लेख छपरी नेते असा केला आहे. (Abhijit Adsul Slams Ravi Rana) शिवाय अशा नेत्यांना महायुतीतून बाहेरचा रस्ता दाखवा अशी मागणीच केली आहे. तसे झाले नाही तर आम्हाला बाहेर पडावं लागेल, असा इशाराच त्यांनी दिला आहे. (Abhijit Adsul Warns Mahayuti) त्यामुळे विधानसभा निवडणुकी आधीच अमरावतीत महायुतीतलं वातावरण चांगलचं तापलं आहे. (Amravati Political News )

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यपालपदाचे आश्वासन दिले होते. असा दावा शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी केला होता. (Anandrao Adsul On President Offer) हे आश्वासन देवून अनेक महिने झाले. पण ते पुर्ण झाले नाही. त्यामुळे आणखी काही दिवस थांबणार नाही तर सर्वोच्च न्यायालयात नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राला पुन्हा आव्हान देणार असा इशारा आनंदराव अडसूळ यांनी दिला होता. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदार संघावर दावाही त्यांनी केला होता. त्यात रवी राणा यांच्या बडनेरा मतदार संघाचाही समावेश होता. यासाठी मुख्यमंत्र्यांवरही दबाव टाकू असेही अडसूळ म्हणाले होते. शिवाय त्यांनी रवी राणा यांच्यावरही टिका केली होती.

आनंदराव अडसूळ यांच्या वक्तव्यानंतर आमदार रवी राणा यांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली होती. (Ravi Rana on Anandrao adsul) अडसूळ यांचे मानसिक संतूलन बिघडले आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. त्यासाठीचा खर्च आपण करू. ते केंद्रीय मंत्री अमित शाह यांना ब्लॅकमेल करत आहेत. शिवाय नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणात त्यांनी पैशांचीही मागणी केली होती असा आरोप रवी राणा यांनी केला होता. शिवाय नवनीत राणा यांना हरवण्यात अडसूळ यांचाचा हातभार लागला होता.(Adsul Behind Navneer Rana Defeat) त्यांनी संपुर्ण यंत्रणा नवनीत राणा यांच्या विरोधात लावली होती असेही राणा म्हणाले होते. त्यांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला होता.

रवी राणा यांच्या या आरोपामुळे माजी आमदार अभिजित अडसूळ हे चांगलेच भडकले. त्यांनी रवी राणा यांचा उल्लेख छपरी नेते म्हणून केला. शिवाय त्यांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणीही केली. (Abhijit Adsul on Ravi Rana) त्यांना स्थानिक भाजपनेत्यांचाही विरोध आहे असेही ते म्हणाले. तर त्यांना महायुतीतून बाहेर काढले नाही तर आम्हाला बाहेर पडावे लागेल असा इशाराही त्यांनी देवून टाकला.

यावेळी अभिजित अडसूळ यांनी अमित शाह यांनी राज्यपालपदा बाबत दिलेल्या आश्वासनाचे पत्र ही दाखवले.(Abhijit Adsul Shown letter from amit shah) त्यामुळे रवी राणा यांनी जो ब्लॅकमेल करण्याचा आरोप केला आहे तो खोटा आहे असे अडसूळ यांनी सांगितले. अमरावती लोकसभा लढू नये असे भाजपने आनंदराव अडसूळ यांना सांगितले होते. जर अडसूळ निवडणूक लढले असते तर खासदार झाले असते. पाच वेळा ते लोकसभा निवडणूक जिंकले आहेत. यावेळी जिंकले असते तर केंद्रात मंत्री असते असा दावा अभिजित अडसूळ यांनी यावेळी केला. राणा यांच्यामुळेच अमरावतीला मंत्रीपद मिळण्याची संधी हुकली असा आरोपही त्यांनी केला.

Latest Posts

Don't Miss