Sunday, January 12, 2025

Latest Posts

राऊतांचा गौप्यस्फोट : अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकत्र असल्याचे दाखवतात पण ते एकत्र नाहीत. अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत् सुरू आहेत. (Sanjay Raut On Ajit Pawar) जर अजित पवारांना बाहेर काढले नाही तर महायुतीला जागा कमी मिळतील, त्यामुळे अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला  आहे.(Sanjay Raut Big Statement on Mahayuti) जेव्हा ते जागावाटपासाठी एकत्र येतील तेव्हा त्यांच्यातच मारामाऱ्या होतील,  असेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबई-गोवा महामार्ग हा स्वर्गात  मार्ग बनला असल्याची टीका करत संजय राऊत म्हणाले,  एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारहाण करण्याची  भाषा करतो म्हणजे प्रकरण टोकाला गेलयं हे दिसत आहे. रस्त्यांची कामे घेणाऱ्या ठेकेदारांकडून महाराष्ट्रात लूटमार सुरु आहे. पाटबंधारे खातं, रस्ते विकास खातं ही खाती शिंदे गटासाठी एटीएम मशीनसारखी झाली आहे. या सरकाला फक्त पैसे पाहिजेत. खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. लोकांचे मृत्यू होत आहेत. पण  सरकारचं लक्ष नाही. ज्यावेळी विधानसभेसाठी जागावाटप होईल त्यावेळी यांच्यात मारामाऱ्या होतील,  खून खराबा होऊ एवढीच आमची इच्छा.

नवाब मलिक यांच्यासंदर्भात बोलताना  संजय राऊत म्हणाले, “भाजपने जशी आमच्या सुडाने कारवाई केली, तशीच नवाब मलिकांवरही सुडानेच कारवाई केली.(Sanjay Raut on Nawab malik) मलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर पुराव्यांसह आरोप केले होते. त्यामुळेच फडणवीसांनी मलिक यांच्यावर तपास यंत्रणांना कारवाई करण्यास भाग पाडले.

देवेंद्र फडणवीसांना माझाल सवाल आहे की, नवाब मलिक विधानसभेत सरकारच्या बाजूच्या बाकावर बसले होते. तेव्हा त्यांनी सरकारी बाकावर बसणं कसं योग्य नाही, याकडे लक्ष वेधत नितीमत्तेचा पुळका आणत एक पत्र लिहीले होते.(Fadnavis Letter On Nawab Malik) आता फडणवीस ते पत्र मागे घेणार का, ते पत्र मागे घेणार नसतील तर मलिकांवरील सर्व आरोप खोटे असल्याचेे त्यांनी मान्य करावं. त्यांनी सु़डानेच मलिकांवर कारवाई केल्याचे मान्य करणार का, असे खुले आव्हान  संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना केलं आहे.(Sanjay Raut challenge to Fadnavis)

Latest Posts

Don't Miss