| TOR News Network |
Ramdas Kadam Latest News : रामदास कदम यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपबाबत कटू अनुभव आल्याचे रामदास कदम म्हणाले. शिवसेना भाजपची युती जवळपास 30 वर्षाची आहे. त्यामुळे सर्व काही तुम्हालाच समजते आणि आम्हाला काहीच समजत नाही असे समजू नका असा इशाराही कदम यांनी दिला.(Ramdas Kadam Warning to Bjp) लोकसभेसाठी शिवसेनेला 15 जागा देण्यात आल्या. त्याही शेवटपर्यंत लटकवून ठेवण्यात आल्या. प्रत्येक जागेवर भाजपनेच हक्क सांगितला. त्याचा फटका शिवसेनेला बसला.(Ramdas Kadam On Loksabha Defeat) जर या जागा वेळीच जाहीर झाल्या असत्या तर शिवसेनेनं 12 ते 13 जागा जिंकल्या असत्या. भाजपने आडकाठी आणल्यामुळे या जागा हरल्या असा थेट आरोप कदम यांनी केला. (Ramdas Kadam Blame Bjp)
भाजपच्या नेत्यांनी संयम पाळायला पाहीजे होता. (Ramdas Kadam On Bjp Leaders) युती होती तर एकत्रीत जागांची घोषणा व्हायला पाहीजे होती. मात्र शिंदेंच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला गेला आहे की काय? असा प्रश्न आता पडतोय. असे वक्तव्य करून कदम यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. ठाणे कल्याणच्या जागेवरही भाजपने दावा केला होता. कल्याणची जागा तर फडणवीसांना जाहीर करावी लागली ही वेळ का आली याचाही विचार झाला पाहीजे असेही कदम म्हणाले.(Ramdas Kadam On Fadnavis)
शिवसेना भाजपची युती आहे. मात्र दापोली या माझ्याच मतदार संघात सर्वात जास्त त्रास हा भाजपचाच आहे असा आरोपही कदम यांनी केला आहे.(Ramdas Kadam On Shiv sena bjp yuti) स्थानिक आमदाराचे खच्चीकरण भाजप करत आहे. मंत्री रविंद्र चव्हाण त्याला जबाबदार आहेत. त्यांची लेखी तक्रार मोदी आणि शहांकडे आपण करणार असल्याचेही रामदास कदम यांनी सांगितले.(Ramdas kadam complaint to modi) त्यांची तक्रार या आधीही फडणवीसांकडे केली आहे. पण करतो बघतो अशी उत्तरे आली आहे. ते ऐकत नसतील तर त्यांना मंत्रीपदावरून हटवा. अशी मागणीच कदम यांनी केली आहे. ते मंत्री आमच्या मुळे आहेत. जर आम्ही बंड केले नसते तर ते मंत्री झाले नसते अशा शब्दात कदम यांनी सुनावले आहे.