Thursday, January 16, 2025

Latest Posts

बाहेर निघताना छत्री सोबत ठेवा – राज्यात यलो अलर्ट कायम

विदर्भच्या विविध भागात आज- उद्या पावसाची शक्यता

Maharashtra Rain Latest News : गेल्या दोन, तीन दिवसांपासून सुरु असलेला पाऊस पुढेही कायम राहणार आहे. आगामी तीन दिवस राज्यासह विदर्भातील विविध भागांत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. (Three More Days Of  Unseasonal Rain In Maharashtra) यामुळे शेतकऱ्यांसमोर आलेले अवकाळीचे संकट अजून टळले नाही. गेल्या दोन दिवसात विदर्भासह राज्यात लाखो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरु आहे. पावसाचा हा धोका अजून पुढील दोन-तीन दिवस असणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आज अनेक भाहात पावसाची शक्यता आहे. (Yellow Alert For Some Districts in Maharashtra) विदर्भ, नाशिक, नगर, पुणे , छत्रपती संभाजीनगरसह बीड जिल्ह्याला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पाऊस राहणार आहे. हवामान खात्याने मराठवाड्याला यलो अलर्ट दिला आहे. अवकाळी पावसामुळे नागपुरात धान पिकाला सर्वाधिक फटका बसलाय. त्यासोबतंच रब्बीतील हरभरा आणि तूर पिकालाही फटका बसलाय. याशिवाय मुग,उडीद,गहूसह कापूस आणि फळ भाज्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.विदर्भात बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात गारपीट झाल्याने शेतातील पिकांनी मान टाकली आहे. राज्यात अवकाळी पाऊसामुळे साधारण १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पुढे अजून दोन दिवस पाऊस असल्याने  नुकसानाचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाच्या आपत्तीमुळे राज्यात सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात एक विदर्भातील आहे. तर जवळपास १६१ जनावरे दगावली आहेत. अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा १६ जिल्ह्यांना फटका बसला असून, विदर्भातील धान पिकाचं मोठं नुकसान झाले आहे.

Latest Posts

Don't Miss