Wednesday, January 15, 2025

Latest Posts

राज्य सरकार ड्रग्स माफियांच्या पाठीशी : Nagpur Winter Assembly 2023

विरोधकांचा आरोप, विधानभवन परिसरात आंदोलन

Nagpur Winter Assembly Latest News: राज्य सरकार ड्रग्स माफियानां पाठीशी घालत आहे. सरकारमधील काही मंत्री यामध्ये सहभागी आहेत, असा आरोप विरोधकांनी सोमवारी लावला. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज सोमवारी सकाळी विधानभवन परिसरात आंदोलन केले. यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आक्रमक दिसून आले. (Maharashtra Govt Protect Drugs Mafia Says opposition leader Vijay Wadettiwar in Winter Assembly session 2023)

‘उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र’, ‘सरकारकडून काय करावी आशा, तरुणांच्या माथी मारली ड्रग्सची नशा’, असे फलक हातात घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरले. यावेळी ‘ड्रग्स माफियांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा निषेध असो’, ‘उडता महाराष्ट्र करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा देण्यात आल्या. याबाबत अधिक सांगताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले,‘शेजारी असलेल्या गुजरातमधून दोन हेलिकॉप्टर येतात. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात ड्रग्स माफिया कार्यरत आहेत. त्यांना सरकार पाठीशी घालत आहे. महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेश सरकारमधील काही मंत्री या माफियांना संरक्षण देताहेत. ललित पाटील या संपूर्ण प्रकरणातील छोटासा प्यादा आहे. वास्वतिक पाहता हे सरकार यासाठी जबाबदार असून त्यांच्याद्वारे ड्रग्स माफिया सक्रिय आहेत.’ यावेळी आंदोलनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह वर्षा गायकवाड पाटील, रवींद्र धंगेकर, सतेज पाटील आदींची उपस्थिती होती.

सलीम कुत्ताच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन उपस्थित

मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा राइट हॅण्ड समजला जाणारा सलिम कुत्ता हा पॅरोलवर असताना नाशिकमध्ये शिवसेनेचे (ठाकरे गट) महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पॅरोल संपण्याच्या पूर्वसंध्येला पार्टी केल्याचे पुरावे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सभागृहात दिले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी घोषित करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता याच सलीम कुत्ताच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहील्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे. गिरीश महाजन तिथे कशाला जेवले, असा सवाल आंदोलनादरम्यान करण्यात आला.

Latest Posts

Don't Miss