Saturday, November 16, 2024

Latest Posts

राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता : राज ठाकरे अमित शाहांची भेटीला दिल्लीत

| TOR News Network | Raj Thackrey Latest News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीला गेले आहेत. त्यांच्या पक्षाचा महायुतीमध्ये प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.(Raj Thackrey to join mahayuti) महायुतीच्या अनेक नेत्यांनी येत्या ४८ तासांत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडेल, असे सूतोवाच केले होते.राज ठाकरे आज अमित शाहांची भेट घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.(Raj Thackrey to meet amit shah in delhi)

ते आमच्या सोबत आले तर स्वागतच आहे

सध्या दिल्लीमध्ये भाजपच्या कोअर समितीची बैठक सुरू असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत प्रदेश पातळीवर अनेक बडे नेते राजधानीमध्ये पोचले आहेत. (Mahayuti meeting in delhi) राज ठाकरेही विशेष विमानाने दिल्लीला पोहचले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे हे आमच्या विचाराचे आहेत ते आले तर स्वागतच आहे असे जाहीर विधान केले होते.(We are ready to welcome if they comes)

‘मनसे’ला दक्षिण मुंबईची जागा

राज ठाकरे हे भाजप नेत्यांना भेटण्याची मागील चार दिवसांतील ही दुसरी वेळ आहे. ‘मनसे’ने दक्षिण मुंबई, रत्नागिरी आणि शिर्डी या तीन मतदारसंघांपैकी एक जागा लढविण्याचा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे. (Mns to contest loksabha from South Mumbai) मुंबईतील मराठी मतांच्या बेगमीसाठी ‘मनसे’ने दक्षिण मुंबईची जागा लढविणे महायुतीला उपयोगाचे ठरेल असे भाजपचे मत आहे. बाळा नांदगावकर येथून उभे राहिल्यास त्यांना मोठा प्रतिसाद मिळू शकतो, असे बोलले जाते.

रोज यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही

राज यांच्या महायुतीमधील प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही आहेत. गेल्या काही निवडणुकांत राज यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती, यामुळेच त्यांच्याबाबत ठोस निर्णय घेताना भाजपला अडचणी येत होत्या. आता चारशेपारचे लक्ष्य गाठण्यासाठी उदार धोरण स्वीकारायचे अशी भूमिका भाजपने घेतल्याचे बोलले जाते.(Abki baar 400 paar)

नाशिक, पुणे व मुंबईत मनसेचा प्रभाव

‘मनसे’ला महायुतीत सामावून घ्यावे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वापुढे ठेवला आहे. नाशिक, पुणे व मुंबई या भागांमध्ये मनसेचा मोठा प्रभाव आहे. राज ठाकरे यांच्या वाट्याला लोकसभा निवडणुकीत फारशा जागा येणार नसल्यातरीसुद्धा विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना चांगल्या जागा मिळू शकतात असे बोलले जाते.  याबाबत राज हे स्वतःच अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.(Raj thackrey to discuss with amit shah)

Latest Posts

Don't Miss