Wednesday, November 20, 2024

Latest Posts

सभेत राज ठाकरेंकडून भ्रम निराश : मोदींकडे केल्या केवळ या मागण्या

Theonlinereporter.com – May 18, 2024 

Raj Thackeray Latest News : राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरिता महायुतीला बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभासुद्धा घेतल्या. काल महायुतीची शिवाजी पार्कवर महासभा झाली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज ठाकरे मंचावर असल्याने त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. (Raj thackeray and pm modi in mumbai rally) राज ठाकरे उद्धव ठाकरे व महायुतीला धारेवर धरतील अशी अपेक्षा जनतेला होती. राज ठाकरे आपल्या स्टाईलने भाषण करतील असे वाटत असताना त्यांनी केवळ पंतप्रधान मोदींकडे ७ मागण्या केल्या आणि आपला भाषण आटोपते घेतले. (Raj thackeray 7 demands to modi)

आपल्या बेधडक व आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले राज ठाकरे आज त्यांच्या भाषणामध्ये महाविकास आघाडी नेत्यांचे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावर कशा पद्धतीने शरसंधान साधतात, त्यांचे कशा पद्धतीने वाभाडे काढतात, याकडे इथे उपस्थित हजारो जनसमुदायाचं लक्ष लागलं होतं.(Eye on raj thackerays speech) परंतु राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केवळ महाविकास आघाडीचे नेते त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची काही लायकी नसल्याने त्यांच्यावर बोलून विनाकारण आपला वेळ वाया घालवू नये असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितलं. तर दुसरीकडे आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांच्या मागण्या वाचून दाखवल्या. (Raj thackeray counts 7 demands to modi) दर वेळा प्रमाणे राज ठाकरे यांचे भाषण न जाल्याने जनतेचा भ्रम निराश झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर उपस्थित झाले आणि राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. (Raj Thackeray shivaji park speech) राज ठाकरे यांच्या भाषणापूर्वी तिन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या शाब्दिक हल्ल्यात राज ठाकरे तेल ओतण्याचे काम करतील अशी अपेक्षा महायुतीच्या नेत्यांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना असताना राज ठाकरे यांनी हा मुद्दाच शांत केला व आपल्या मागण्या मोदींसमोर मांडल्या.

राज ठाकरे यांच्या मागण्या

1) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा

2) मराठा साम्राज्याचा इतिहास शालेय मुलांना लहानपणापासून शिकवला जावा

3) शिवरायांच्या गड किल्ल्यांना पुन्हा वैभव प्राप्त करून घेण्यासाठी एक राष्ट्रीय समिती नेमावी

4) देशात अनेक रस्ते तुम्ही बनवले. पण मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर व्हावा. जो आजही खड्ड्यात आहे

5) या देशाचं संविधान कधीच बदलले जाणार नाही. उद्धव ठाकरे व काँग्रेसला जे मुसलमान मदत करतात. कारण त्यांना मागच्या १० वर्षात डोकं वर करता आलं नाही आहे. हे मुठभर आहेत. त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा.

6) मुंबईतील रेल्वेवर विशेष लक्ष द्यावे.

Latest Posts

Don't Miss