Saturday, January 18, 2025

Latest Posts

राज ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक ; नारायण राणेंना पराभूत करणाऱ्या रणरागिणीला मनसेकडून तिकीट

| TOR News Network |

Raj Thackeray latest News :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एकाच दगडामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असे दोन पक्षी मारण्याचा पराक्रम केला आहे.(MNS Raj Thackeray Master stroke) निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेच्या गळाला एक मोठा मासा लागला असून ‘मातोश्री’च्या अंगणातच हे नाट्य रंगलं आहे. विशेष म्हणजे नारायण राणेंना पराभूत करणारी ही महिला नेता भाजपाला सोडचिठ्ठी देत मनसेमध्ये प्रवेश केला आहे.

 वांद्रे पूर्व मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटातून वरुण सरदेसाई यांना तिकीट देण्यात आले आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी हे रिंगणात उतरले आहेत. त्यातच आता मनसेकडून तृप्ती सावंतांना तिकीट देण्यात आल्याने आता या ठिकाणी हायव्होलटेज लढाई पाहायला मिळणार आहे.(Trupti sawant to contest from MNS)

तृप्ती सावंत यांनी लढवलेली 2015 मधील वांद्रे पूर्वची पोटनिवडणूक गाजली होती. शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार बाळा सावंत यांचं निधन झालं. त्यामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. त्यावेळी शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती. 2015 च्या निवडणुकीत तृप्ती सावंत यांच्याविरोधात काँग्रेसकडून नारायण राणेंना रिंगणात उतरण्यात आलं होतं. थेट ‘मातोश्री’ला चॅलेंज देण्यासाठी नारायण राणे यांनी शड्डू ठोकला होता. आधी एकतर्फी वाटणारी आणि सहानुभूतीच्या लाटेवर असणारी ही निवडणूक, चांगलीच चुरशीची झाली होती. ‘मातोश्री’च्या अंगणात नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलं होतं. या निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी जवळपास 20 हजारांच्या फरकाने नारायण राणेंचा पराभव केला होता.

Latest Posts

Don't Miss