Monday, January 13, 2025

Latest Posts

हे सांगण्यासाठी राज ठाकरे यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही- खा. राऊत

| TOR News Network |

Sanjay Raut Latest News : शिवसेना ही काही शिंदेंची किंवा उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी नाही. धनुष्यबाण आणि शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचीच प्रॉपर्टी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे शरद पवारांचच अपत्य आहे, असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर टीकास्त्र सोडलं. डोंबिवलीतील पहिल्या सभेत राज ठाकरे यांनी सर्वांवरच जोरदार हल्ला चढवला. मात्र त्यांच्या याच विधानाचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.(Sanjay Raut Reaction on Raj Thackeray Sabha)

शिवसेना, शिवसैनिक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची जी प्रॉपर्टी आहे ती एकनाथ शिंदेंच्या घशात घालणारे मोदी-शाह यांचीच तळी राज ठाकरे उचलत आहेत. (Sanjay Raut slams raj Thackeray)  त्यांचा हल्ला मोदी-शहांवर पाहिजे. त्यांनी गॅलरीत बघून बोलू नये, तर सभागृहात पाहून बोलावं. शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे हे सांगण्यासाठी राज ठाकरे यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ज्या मोदी शहांनी बेकायदेशीरपणे शिवसेना एकनाथ शिंदेंना दिली, त्याच भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात व्हावा यासाठी तुमचे प्रयत्न आहेत.(Sanjay Raut on Modi-shah) त्यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना कधीच माफ करणार नाहीत असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला. राज ठाकरे मूळ मुद्दा सोडून बोलत आहेत ते काय बोलत आहेत त्यावर महाराष्ट्र चालत नाही, असेही ते म्हणाले.

‘ आम्ही काय वेगळं सांगत होतो का? ती प्रॉपर्टी बाळासाहेबांचीच आहे. शरद पवारांचंच अपत्य आहे राष्ट्रवादी. त्यांच्या हयातीत तो पक्ष अजित पवारांना देणारा निवडणूक आयोग कोण ? (Sanjay raut on election comission) जनता, शिवसेना, शिवसैनिक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची जी प्रॉपर्टी आहे ती एकनाथ शिंदेंच्या घशात घालणारे मोदी-शाह कोण ? हाच आमचा सवाल आहे. आणि त्याच मोदी-शाहांची तळी राज ठाकरे उचलत आहेत.

त्यांचा हल्ला मोदी-शहांवर पाहिजे. त्यांनी गॅलरीत बघून बोलू नये, तर सभागृहात पाहून बोलावं. ही बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी एकनाथ शिंदेंना परस्पर दिली. जशी मुंबई पोर्तुगिजांनी ब्रिटीशांना आहेर म्हणून दिली, त्याच पद्धतीने मोदी- शहा या दोन व्यापाऱ्यांनी बाळासाहेब ठाकऱ्यांची शिवसेना ही आहेर म्हणून देऊन टाकली. शिवसेना काय मोदी-शाहांच्या घरात निर्माण झाली होती का ? राज ठाकरेंनी या मुद्यावर बोलायला पाहिजे. शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे हे सांगण्यासाठी राज ठाकरे यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही.

आज तुम्ही (राज ठाकरे) त्यांचाच (मोदी) प्रचार करत आहात. पंतप्रधान मोदी, अमित शाह, फडणवीस, आज तुम्ही यांनाच आपले नेते मानत आहात. त्यांनीच ही बाळासाहेब ठाकरेंची, महाराष्ट्राच्या जनतेची प्रॉपर्टी बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदेंना दिली. त्याच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री तुम्ही महाराष्ट्रात करायला निघाला आहात, यासारखं दुसरं पाप नाही. आणि (त्यासाठी) बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत ‘ अशा शब्दांत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना खडे बोल सुनावले.

Latest Posts

Don't Miss