Thursday, January 16, 2025

Latest Posts

रिकामा हॉल पाहून राज ठाकरेंनी १० मिनीटात आटोपला बदलापूर दौरा

| TOR News Network |

Raj Thackeray Latest News : बदलापूरला चिमुकलीवर झालेले अत्याचार प्रकरण अध्याप शांत झालेले नाही.या प्रकरणी जनतेसह अनेक राजकीय नेत्यांनी राज्य सरकार वर आपला रोष व्यक्त केला आहे.नुकतेच राज ठाकरे यांनी राज्य सरकार विरोधात आपले संताप व्यक्त केला होता. (Raj Thackeray express anger on Badlapur case) मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते. राज ठाकरे हा प्रकार घडला तेव्हा विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मनसेच्या स्थानिक-पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पिडित कुटुंबीयांशी संवाद साधला होता.

बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.  त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसह अनेक राजकीय नेत्यांनी यावर संताप व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर जेव्हा जे बदलापूर येथे गेले मात्र हॉल रिकामा असल्याचे पाहून न बोलताच निघून गेले.( Raj Thackeray visit Badlapur)

बदलापूर अत्याचार प्रकरणी राज ठाकरे यांनी पोलीस आणि राज्य सरकार विरोधात संताप व्यक्त केला होता. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते. राज ठाकरे हा प्रकार घडला तेव्हा विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मनसेच्या स्थानिक-पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कुटुंबीयांशी संवाद साधला होता. त्यानंतर बुधवारी ते बदलापूरमध्ये दाखल झाले होते. परंतु ते संवाद न साधता निघून गेले.( Raj Thackeray went back from Badlapur)

या घटनेनंतर बदलापूर शहरात झालेल्या बंद आणि रेल रोको व शाळेसमोरील आंदोलनानंतर अनेक स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी व उत्स्फूर्त आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी या आंदोलकांना घरी जाऊन धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे राज ठाकरे पालक आणि बदलापूरकरांची संवाद साधण्यासाठी येणार होते. (Raj Thackeray at Badlapur)

राज ठाकरे बुधवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास बदलापुरात दाखल झाले. नियोजित कार्यक्रमस्थळी आल्यानंतर अर्ध्याहून रिकामा हॉल राज ठाकरे यांनी पाहिला. (Hall Empty when Raj Thackeray visit Badlapur) त्यानंतर ते थेट पुढच्या बाजूला असलेल्या काही महिलांशी बोलले. तसेच या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या व ज्या महिला पत्रकारांविरोधात शिवसेनेचे स्थानिक नेते वामन म्हात्रे यांनी अर्वाच्च भाषेत केलेल्या टीके संदर्भातील महिला पत्रकारांशीही ते बोलले.

सकाळपासून ताटकळत बसलेले पालक आणि बदलापूरकर व मनसेचे पदाधिकारी यांच्यात संवाद झालाच नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे फलित काय? असा प्रश्न राज ठाकरे निघून गेल्यानंतर सर्वसामान्य बदलापूरकर विचारत होते. तर मनसेच्या स्थानिक नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे चेहरे बरेच काही सांगून जात होते.

Latest Posts

Don't Miss